प्रसिद्धीच माझ्या मागे लागली आहे - स्वामी

By Admin | Updated: June 30, 2016 05:30 IST2016-06-30T05:30:51+5:302016-06-30T05:30:51+5:30

सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी आपण प्रसिद्धीच्या मागे लागलो नाही, तर प्रसिद्धीच आपल्या मागे लागल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले.

The publicity has followed me - the owner | प्रसिद्धीच माझ्या मागे लागली आहे - स्वामी

प्रसिद्धीच माझ्या मागे लागली आहे - स्वामी


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धीच्या हव्यासासाठी बेलगाम वक्तव्ये करू नका, असे फटकारल्यानंतर भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी बुधवारी आपण प्रसिद्धीच्या मागे लागलो नाही, तर प्रसिद्धीच आपल्या मागे लागल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले.
आपण मोदींचे प्रशंसक आहोत. त्यामुळे आपण त्यांची बाजू घेतो, असे सांगताना स्वामी यांनी पत्रकारांना लक्ष्य केले. पत्रकार मंडळी खोट्या गोष्टी पसरवून मला जाणीवपूर्वक चिथावतात, असे ते म्हणाले.
आपण माध्यमांकडे गेलो नसून, माध्यम प्रतिनिधींचीच आपल्या घरासमोर रांग लागलेली आहे, असे टिष्ट्वट स्वामी यांनी केले.
‘नवी समस्या : जेव्हा प्रसिद्धी एखाद्या नेत्याच्या मागे हात धुऊन लागते. ३० ओबी व्हॅन घराबाहेर उभ्या, चॅनल्सकडून २०० मिस कॉल्स आणि पापाराझीस असे चित्र असेल, तर बिचारा नेता तरी काय करणार असे टिष्ट्वट स्वामी यांनी केले आहे.

Web Title: The publicity has followed me - the owner