मालेगाव ग्रा़पं़तील प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:24+5:302015-02-08T00:19:24+5:30
पॅनलप्रमुखांनी लावली फिल्डींग

मालेगाव ग्रा़पं़तील प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
प नलप्रमुखांनी लावली फिल्डींगमालेगाव : माहे डिसेंबर महिन्यात होणार्या मालेगाव येथील ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर झाले असून अनेकांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी केली असून प्रभागनिहाय १५ जागेत पुढील निवडणुकीत महिलांची संख्या जास्त असून मालेगाव ग्रा़पं़त महिलाराज येणार आहे़अर्धापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मालेगावची ग्रा़पं़ आहे़ या ग्रा़पं़त ५ प्रभागातील १५ जागेसाठी ही निवडणूक होणार आहे़ नुकतेच या प्रभागातील आरक्षण सोडत पद्धतीने जाहीर झाले़ त्यात प्रभागनिहाय आरक्षण असे- प्रभाग क्ऱ१- इतर मागासवर्ग पुरूष-१, अनु़जाती पुरूष-१, अनु़जाती महिला तर प्रभाग क्ऱ२ मध्ये- इतर मागास वर्ग स्त्री-१, सर्वसाधारण महिला-१ व सर्वसाधारण पुरूष-१, प्रभाग क्ऱ३ मध्ये सर्वसाधारण महिला २ व सर्वसाधारण पुरूष-१, प्रभाग क्ऱ४ मध्ये इतर मागास प्रवर्ग स्त्री, अनु़जाती स्त्री व सर्वसाधारण पुरूष तर प्रभाग क्ऱ५ मध्ये सर्वसाधारण स्त्री-१, इतर मागास प्रवर्ग पुरूष-१ अनु़जाती पुरूष असे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले़ गत वर्षीच्या तुलनेत पुढील निवडणुकीत आरक्षणात बदल झाल्याने अनेक जण हिरमुसले आहेत़ तर आरक्षणाच्या जागी पॅनलप्रमुख कोणता उमेदवार द्यावयाचा याबाबत आतापासूनच फिल्डींग लावली आहे़