आर्थिक सुधारणांना जनतेचा पाठिंबा
By Admin | Updated: April 24, 2017 00:42 IST2017-04-24T00:42:16+5:302017-04-24T00:42:16+5:30
भारतात प्रथमच आर्थिक सुधारणांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. ताज्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे त्याचे उत्तम उदाहरण

आर्थिक सुधारणांना जनतेचा पाठिंबा
वॉशिंग्टन : भारतात प्रथमच आर्थिक सुधारणांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. ताज्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले. भारतीय राजदूताने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात जेटली बोलत होते.
जेटली यांच्या सन्मानार्थ अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेज सरना यांच्याकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वागत समारंभात बोलताना जेटली म्हणाले की, भारतात प्रथमच आर्थिक सुधारणांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. ट्रम्प प्रशासनातील अधिकारी, नेते, विचारवंत आणि भारतीय अमेरिकी नागरिकांना संबोधित करताना जेटली म्हणाले की, काही महत्वपूर्ण पाऊले उचलण्यात भारत किती वेळ घेतो याबाबत जगभरातील लोकांना शंका होती. पण, मला असे वाटते की, तो काळ आता मागे गेला आहे.