लोकपर्ययची बातमी (फोटो मेलवर)

By Admin | Updated: May 6, 2014 17:09 IST2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T17:09:04+5:30

स्थलांतरितांच्या बालकांसाठी

Public news (photo mailer) | लोकपर्ययची बातमी (फोटो मेलवर)

लोकपर्ययची बातमी (फोटो मेलवर)

थलांतरितांच्या बालकांसाठी
बाल आनंद जीवन शाळा
औरंगाबाद - ऊसतोडणी, वाहतूक मजूर म्हणून रोजगारासाठी गुजरात, पश्चिम महाराष्ट्रात सात महिने स्थलांतर करणार्‍या भिल्ल आदिवासींच्या बालकांसाठीच्या बाल आनंद जीवन शाळेला सात महिने पूर्ण झाले. लोक समिती-लोकपर्यायने यासाठी पुढाकार घेतला आहे. यानिमित्त बालक-पालक आनंद मेळावा घेण्यात आला.
मेळाव्यात लोकपर्यायच्या अध्यक्ष मंगल खिंवसरा, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद-इलाईट सुहास वैद्य, दिनकर आरबाळे, प्राचार्या मनोरमा शर्मा, स्मार्त व वैद्य ताई आदी उपस्थित होते. बालकांनी सांस्कृतिक कार्यकम सादर केले.
ॲक्शन एड (मंुबई), औरंगाबाद व पुणे येथील नागरिकांच्या सहकार्यातून वैजापूर तालुक्यातील पाराळा-जुनोने येथील भीमगडवरील बाल आनंद जीवन शाळा हा त्याचाच एक भाग आहे. कायम दुष्काळी परिस्थिती आणि बदलत्या वातावरणामुळे रोजगारासाठी स्थलांतर करणार्‍या भिल्ल, ठाकर, पारधी, आदिवासी, दलित आदींच्या मुलांचे शिक्षण होत नाही. गरोदर महिलांचेही हाल होतात. बाल व महिला मृत्यूचे प्रमाणही खूप आहे. या परिस्थितीत या समाजात शिक्षणाचे प्रमाण केवळ २ ते ५ टक्के आहे. भारत सरकारच्या अनुसूचित जमाती आणि पारंपरिक वन निवासी (वन हक्कांची मान्यता) अधिनियम २००६ आणि नियम २००८ व २०१२ नुसार वैजापूर, खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यांत ३००च्या वर वन जमिनी आणि २५०० च्या वर गायरान जमिनीचे हक्क मिळवून घेण्यात लोकसमिती लोकपर्यायला यश आले आहे. अनेक पारधी, भिल्ल आदिवासी बालकांना पाचगणी व शासकीय पब्लिक स्कूल, शासकीय आश्रम शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी लोकसमिती-लोकपर्यायने यशस्वी प्रयत्न केला आहे. संघर्षाबरोबर रचना, शिक्षणावर भर दिला आहे.

Web Title: Public news (photo mailer)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.