खरे PUBG लवर! गेम खेळताना प्रेमाचं मिशन पूर्ण झालं; एकत्र आयुष्य घालवण्यासाठी थेट लग्नच केलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2022 15:37 IST2022-01-12T15:26:46+5:302022-01-12T15:37:33+5:30
PUBG Lover : दोन अनोळखी लोक PUBG खेळताना एकमेकांना ऑनलाईन भेटले. त्यांचं बोलणं सुरू झालं आणि दोघंही प्रेमात पडले.

खरे PUBG लवर! गेम खेळताना प्रेमाचं मिशन पूर्ण झालं; एकत्र आयुष्य घालवण्यासाठी थेट लग्नच केलं
नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. सोशल मीडियावर अनेक एक एकमेकांच्या प्रेमात पडतात. पण आता ऑनलाईन PUBG खेळताना दोन अनोळखी व्यक्ती प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. दोन अनोळखी लोक PUBG खेळताना एकमेकांना ऑनलाईन भेटले. त्यांचं बोलणं सुरू झालं आणि दोघंही प्रेमात पडले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्ये ही घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या एका तरुणीचं PUBG खेळताना बंगालच्या एका तरुणावर प्रेम जडलं. यानंतर तरुणीने हैराण करणारं काम केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कर्नाटकमधीलल फ्रिजा नावाच्या एका तरुणीला पब्जी खेळायला आवडायचं. ती ऑनलाईन पब्जी खेळत असे. पब्जी खेळतानाच तिची ओळख पश्चिम बंगालच्या धूपगुडी येथे राहणाऱ्या सैनूर आलम नावाच्या मुलासोबत ऑनलाईनच झाली. पब्जी खेळतानाच दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
PUBG खेळता खेळता प्रेम जडलं
प्रेमात पडल्यावर दोघांनीही एकमेकांसोबत आपला मोबाईल नंबर शेअर केला. यानंतर दोघंही बराच वेळ फोनवर बोलत असे. याआधी दोघंही कधीच एकमेकांना भेटले नव्हते. गेमच्या माध्यमातूनत त्यांची ओळख झाली होती. एकमेकांसोबत फोनवर बोलत असतानाच फ्रिजा आणि सैनूर एकमेकांच्या प्रेमात बुडाले. याच दरम्यान फ्रिजाने एक निर्णय घेतला आणि मोठं पाऊल उचललं. एक दिवस फ्रिजा कर्नाटकातून विमानाने सैनूर आलमच्या धूपगुडी गावात पोहोचली.
त्याच्यासाठी घरदार सोडलं अन् असं काही घडलं...
फ्रिजा थेट या तरुणाच्या घरी गेली. यानंतर सैनूरने जेव्हा घराचा दरवाजा उघडला तेव्हा त्याचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तरुणीला अचानक आपल्या घराबाहेर पाहून तरुणाच्या घरातील लोकही हैराण झाले. यानंतर दोघांची लव्ह स्टोरी घरच्यांनाही समजली. यानंतर मुलीच्या घरच्यांना बोलावलं गेलं आणि दोन्ही कुटुंबीयांनी मिळून अतिशय उत्साहात दोघांचंही लग्न लावून दिलं. सध्या यांच्या या प्रेमकहाणीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.