‘पीएसएलव्ही सी-23’ची उलटगणती

By Admin | Updated: June 29, 2014 02:29 IST2014-06-29T02:29:06+5:302014-06-29T02:29:06+5:30

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्ने) विकसित केलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही सी-23)च्या उड्डाणाची उलटगणती सुरू झाली आहे.

PSLV C-23's countdown | ‘पीएसएलव्ही सी-23’ची उलटगणती

‘पीएसएलव्ही सी-23’ची उलटगणती

>चेन्नई : श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्ने) विकसित केलेल्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही सी-23)च्या उड्डाणाची उलटगणती सुरू झाली आहे. शनिवारी सकाळी 8 वाजून 52 मिनिटांनी ही 49 तासांची उलटगणती सुरू झाली. 3क् जून रोजी सकाळी 9 वाजून 52 मिनिटांनी हे यान अवकाशात ङोपावणार आहे. 
पृथ्वीची पाहणी करणा:या फ्रान्सच्या उपग्रहाव्यतिरिक्त सिंगापूर, कॅनडा व जर्मनीच्या चार अन्य उपग्रहांनाही पीएसएलव्ही सी-23 द्वारे अंतराळात सोडले जाणार आहे. 
श्रीहरिकोटा येथे काल झालेल्या प्रक्षेपण संमती मंडळा(एलएबी)च्या बैठकीत या प्रक्षेपणाला मान्यता देण्यात आली होती. या यानाचे प्रक्षेपण यापूर्वी 3क् जून रोजी सकाळी 9 वाजून 49 मिनिटांनी निश्चित करण्यात आले होते. ते आता 9 वाजून 52 मिनिटांनी पुनर्निर्धारित केले आहे. 
इस्नेने आतार्पयत पीएसएलव्हीतून 35 परदेशी उपग्रहांचे उड्डाण केले आहे. (वृत्तसंस्था)
 
4पंतप्रधान नरेंद्र मोदी या उड्डाणाच्या वेळी उपस्थित राहणार असून, ते फ्रान्सच्या स्पॉट-7 या उपग्रहाच्या उड्डाणाचे निरीक्षण करतील. स्पॉट-7 हा पृथ्वीची पाहणी करणारा एक उपग्रह असून, तो भारताच्या आयआरएसएससारखा उपग्रह आहे.
4त्यांचा हा दौरा केवळ उड्डाणाच्या पाहणीविषयक असून, अन्य कुठलाही कार्यक्रम यात समाविष्ट केलेला नाही. त्यांच्या आगमनाकरिता विमानतळ व उड्डाणस्थळावरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडेकोट करण्यात आली आहे.

Web Title: PSLV C-23's countdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.