पार्किंगसाठी वापर होणाऱ्या जागांची माहिती द्या

By Admin | Updated: July 3, 2015 23:00 IST2015-07-03T23:00:09+5:302015-07-03T23:00:09+5:30

अवैध वसुली : १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

Provide information about the places used for parking | पार्किंगसाठी वापर होणाऱ्या जागांची माहिती द्या

पार्किंगसाठी वापर होणाऱ्या जागांची माहिती द्या

ैध वसुली : १५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश
नागपूर : इमारत नियंत्रण नियमांतर्गत व्यावसायिक इमारतीत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे. परंतु असे न करता सर्वसामान्य नागरिकांकडून पार्किंग शुल्क ाची वसुली सुरू आहे. तसेच महापालिके च्या जागावरही अवैध पार्किंग सुरू करून वसुली केली जात आहे. याला आळा घालण्यासाठी सर्व झोनमधील पार्किगच्या जागेची माहिती १५ दिवसात देण्याचे आदेश उपसमितीने शुक्रवारी दिले.
काही ठिकाणी मनपा व शासकीय जागेवर अवैध पार्किग सुरू करून वसुली केली जात आहे. याला आळा बसावा यासाठी स्थायी समितीने उपसमिती गठित केली आहे. यात नगरसेवक संजय बालपांडे, संदीप सहारे, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, व जयंत दांडेगावकर आदींचा समावेश आहे. या उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. यात झोन कार्यालयांना झोनमधील पार्किग व्यवस्थेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मॉल, मंगल कार्यालये, सिनेमागृह आदी ठिकाणच्या पार्किगचा आढावा घेण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Provide information about the places used for parking