शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

अभिमानास्पद! 'सिरम'चे सीईओ आदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर

By दीपक अविनाश कुलकर्णी | Published: December 05, 2020 6:04 PM

कोरोनाविरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा उचलल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

पुणे : अवघ्या जगाचे लक्ष कोरोनावरील लसची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटकडे लागलेले आहे. मात्र याच दरम्यान सिरमसह सर्व भारतीयांना भूषणावह अशी एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांना 'एशियन ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर केला आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत मोलाचा वाटा उचलल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येणार आहे. 

जगातील सर्वात मोठी लस उत्पादनाची क्षमता सीरमकडे आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि ऍस्ट्राझेनेका कंपनीने विकसित केलेल्या कोरोनावरील 'कोविशिल्ड' लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत दिली होती. भारतात सध्या कोविशिल्ड या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे.

सिंगापूर येथील ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वर्तमानपत्राकडून पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी आशियातील सहा व्यक्तींची निवड झाली आहे.त्यात आदर पुनावाला यांच्यासह चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुईची मोरिशिटा आणि चीनचे संशोधक झँग योंगझेन, सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग, दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

कोरोना संकटकाळात 'एशियन ऑफ द इयर' पुरस्कारातील व्यक्तींनी संशोधन , निर्मिती, वितरण, यांसारख्या विविध पातळ्यांवर महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. आदर पुनावाला  यांनी कोव्हीशिल्ड लसची निर्मिती, तसेच चीनचे संशोधक असलेले झँग यांनी Sars-CoV-2 विषाणूचा जिनोम सर्वात पहिल्यांदा शोधून काढत ऑनलाइन माहिती प्रसिद्ध केली होती. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस वितरण करणार आहे. या निवड झालेल्या सर्व व्यक्तीना ‘व्हायरस बस्टर्स’ म्हणून संबोधले आहे.

पुरस्कार जाहीर करताना ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ ने म्हटले आहे की, कोरोना या महामारीने अनेकांचा जीव घेतला आहे. परंतु, प्रचंड लोकसंख्या असलेल्या आशिया खंडातील या ‘व्हायरस बस्टर्स’नी या आव्हानात्मक काळात देखील उत्तम काम करत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. त्यांच्या धैर्याला व सर्जनशीलतेला आम्ही सलाम करतो. जगातील जनजीवन पूर्णपणे थांबले असताना पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी आशेचा किरण असल्याचे दाखवून दिले.

.......................................

सिरम इन्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीच्या वितरणासाठी सुरूवातीला भारतालाच प्राधान्य..   सिरम इन्टिट्युटकडून कोविशिल्ड लसीच्या वितरणासाठी सुरूवातीला भारतालाच प्राधान्य प्राधान्य दिले जाईल असे सिरम इन्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी आधीच जाहीर केले. भारतातील वितरणाबाबत अद्याप केंद्र सरकारशी कोणताही लिखित करार झालेला नसला तरी जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी डोस लागणार असल्याचे आरोग्य मंत्रालयाने यापुर्वीच स्पष्ट केले आहे. जानेवारीपासून दर महिन्याला १० कोटी डोसचे उत्पादन केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पट केले. 

 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याsingaporeसिंगापूर