नवी दिल्ली : एका हिंदी वृत्तवाहिनीतील दोन वरिष्ठ पत्रकारांना द्यावे लागलेले राजीनामे आणि केंद्र सरकारवर टीका होणाऱ्या कार्यक्रमाच्या प्रसारणात आणले गेलेले अडथळे यांची गंभीर दखल एडिटर्स गील्ड आॅफ इंडियाने घेतली आहे. तसेच प्रसारमाध्यमाच्या कार्यक्रमांत सरकारकडून होणाºया हस्तक्षेपाचा तीव्र निषेधही केला आहे.माध्यमांच्या मालकांनीही सरकार किंवा कोणाही पुढे झुकू नये, असे आवाहन करतानाच, दोन वरिष्ठ पत्रकारांना जावे लागले, हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर तसेच लोकशाहीच्या महत्त्वाच्या स्तंभावर झालेला हल्ला आहे, अशा असेही एडिटर्स गील्डने म्हटले आहे. याबाबत सरकारने स्पष्टिकरण द्यावे, अशी मागणी गील्डने केली आहे. हे प्रकार कोणत्या हिंदी वृत्तवाहिनीच्या बाबतीत झाले, त्याचा मात्र उल्लेख गील्डच्या पत्रकात नाही.
एडिटर्स गील्डकडून वृत्तवाहिनीतील हस्तक्षेपाचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 05:23 IST