पशुधनाला विमा योजनेचे संरक्षण कवच
By Admin | Updated: July 10, 2014 10:04 IST2014-07-10T00:49:34+5:302014-07-10T10:04:44+5:30
नैसर्गिक आपत्ती, अपघात अथवा रोगराईमुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाला विमा योजनेचे संरक्षण कवच उपयुक्त ठरत आहे.

पशुधनाला विमा योजनेचे संरक्षण कवच
संतोष वानखडे - वाशिम
नैसर्गिक आपत्ती, अपघात अथवा रोगराईमुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाला विमा योजनेचे संरक्षण कवच उपयुक्त ठरत आहे. 2क्13-14 या आर्थिक वर्षात राज्यभरातील एकूण 15क्क् दाव्यांपैकी 8क्9 दावे आजवर निकाली काढण्यात आले असून, विम्यापोटी पशुपालकांना 2.21 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
पशुधनास कायमस्वरूपी अपंगत्व किंवा आकस्मिक मृत्यू झाल्यास पशुपालकास आर्थिक संरक्षण देणो आणि पशुधनात गुणात्मक सुधारणा करणो, या दुहेरी उद्देशाने 2क्क्6-क्7 पासून केंद्रपुरस्कृत पशुधन विमा योजना महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळामार्फत राबविण्यात
येते.
सुरुवातीला सहा जिल्ह्यांमध्ये असलेली ही योजना 2क्11 पासून 18 जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली.
यामध्ये पुणो विभागातील पुणो, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि अहमदनगर, औरंगाबाद विभागातील, औरंगाबाद, बीड, लातूर, नांदेड आणि जालना, नागपूर विभागातील भंडारा, वर्धा, गोंदिया आणि नागपूर, तर अमरावती विभागातील केवळ यवतमाळ या एकमेव जिल्ह्याचा समावेश आहे.
2क्12-13 मध्ये 18,774 जनावरांचा विमा उतरविण्यात आला होता. या वर्षामध्ये एकूण 1क्54 दावे निकाली काढण्यात आले. विम्यापोटी 2.72 कोटी रुपये पशुपालकांना वितरित केले. 2क्13-14 च्या डिसेंबरअखेर्पयत जवळपास 75क्क् जनावरांचा विमा उतरविण्यात आला. तसेच 15क्क् पैकी 8क्9 दावे निकाली काढण्यात आले असून, विम्यापोटी 2.21 कोटी पशुपालकांना वितरित करण्यात आले.
नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे जनावराचा मृत्यू झाल्यास पशुसंवर्धन विभागामार्फत विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर करावा लागतो. त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यानंतर पशुपालकांना नुकसानभरपाई दिली जाते. जनावरांचा विमा उतरविण्याबाबत जनजागृती होत नसल्याने विमा काढणा:या पशुपालकांच्या संख्येचा आलेख अपेक्षेएवढा उंचावला नाही, ही शोकांतिका आहे.
4शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा:या पश्चिम व:हाडातील वाशिम, अकोला आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यांमधील पशुधनाला विमा योजनेचे कवच नाही.
4केंद्रपुरस्कृत विमा योजना लागू नसल्याने पशुधनाच्या नुकसानभरपाईपासून पशुपालकांना वंचित राहावे लागते.
4या योजनेत पश्चिम व:हाडाचा समावेश लवकरच होईल, अशी अपेक्षा पशुपालकांना आहे.