ठिबक सिंचनसाठी ६१ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी : जिल्हा रुग्णालयाची १६ रोजी पाहणी करणार
By Admin | Updated: April 13, 2016 00:21 IST2016-04-13T00:21:28+5:302016-04-13T00:21:28+5:30
जळगाव : जिल्हाभरात पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी दिली.

ठिबक सिंचनसाठी ६१ कोटींचा प्रस्ताव जिल्हाधिकारी : जिल्हा रुग्णालयाची १६ रोजी पाहणी करणार
ज गाव : जिल्हाभरात पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन व स्प्रिंकलरच्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळावे यासाठी ६१ कोटींचा प्रस्ताव केंद्रशासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी मंगळवारी दिली.जिल्हा रुग्णालयाची १६ रोजी पाहणीजिल्हा रुग्णालयाबाबत सध्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. तेथील कामकाजाच्या तपासणीसाठी शनिवार १६ रोजी सकाळी ९ वाजता जिल्हा रुग्णालयात पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सीटीस्कॅन मशिन तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कोठे बसविण्याची आवश्यकता आहे, त्याची पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तीन लाख जमीन आरोग्य पत्रिकांचे उद्दिष्ट्यगेल्या वर्षी जिल्हा प्रशासनातर्फे एक लाख २३ हजार शेतकर्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी तीन लाख चार हजार शेतकर्यांना जमिनीची आरोग्यपत्रिका देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.२१ रोजी शेतकरी मेळावाजिल्हा प्रशासनातर्फे २१ एप्रिल रोजी शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी जिल्हा नियोजन भवनात पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली खरीप पूर्व आढावा बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी किसान सॉफ्टवेअरचे अनावरण करण्यात येणार आहे. २२ रोजी जलयुक्त शिवार योजनेच्या कामातील प्रगतीच्या आढाव्याची बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.तीन कोटी निधीबाबत कारवाईची सूचनाजलसंधारण विभागाने तीन कोटी रुपयांचा निधी जमा न केल्याने तो शासनाकडे परत गेला. याबाबत दोषींविरुद्ध कारवाई करण्यासाठी आपण अधीक्षक अभियंता यांना सूचना केली आहे. जिल्हा नियोजन मंडळामधून या कार्यालयाला आता एक रुपयांचादेखील निधी देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.