शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Prophet Row : नुपूर शर्मा यांना समन देण्यासाठी मुंबई पोलीस दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 23:24 IST

नुपूर शर्मा यांना पाठवण्यात आलेल्या समनमध्ये मुंबईच्या पायधूनी पोलिसांनी, त्यांना 25 जूनला 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी,  मुंबईपोलिसांचा एक चमू भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांना समन देण्यासाठी दिल्लीत पोहोचला आहे. मुंबईचे पायधूनी पोलीस हे समन घेऊन पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर शर्मा यांना यापूर्वी त्यांच्या ईमेलवरही समन पाठवण्यात आले होते. आता पोलिसांचा एक चमू त्यांना समनची कॉपी देण्यासाठी दिल्ली येथे पोहोचला आहे.

नुपूर शर्मा यांना पाठवण्यात आलेल्या समनमध्ये मुंबईच्या पायधूनी पोलिसांनी, त्यांना 25 जूनला 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. रजा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. वाद वाढल्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. भारताशिवाय अनेक इस्लामिक देशांनीही त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता. त्याच्यावर अनेक राज्यांत एफआयआर दाखल करण्यात आले होते.

नुपूर यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल -नुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांनीही समन बजावले होते. पोलिसांनी त्यांना 22 जूनला हजर  होण्यास सांगितले आहे.  मुंब्रा येथे मोहम्मद गुफरान खान नावाच्या शिक्षकाने नुपूर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय, एक तक्रार ठाण्यातही दाखल करण्यात आली आहे.

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसdelhiदिल्लीBJPभाजपाPoliceपोलिसMumbaiमुंबई