मालमत्ता प्रदर्शन: चौकट

By Admin | Updated: December 21, 2014 23:49 IST2014-12-21T23:49:31+5:302014-12-21T23:49:31+5:30

बांधकाम व्यावसायिकांत सुंदोपसुंदी

Property Performance: Window | मालमत्ता प्रदर्शन: चौकट

मालमत्ता प्रदर्शन: चौकट

ंधकाम व्यावसायिकांत सुंदोपसुंदी
बांधकाम व्यावसायिकांत सुरू असलेली सुंदोपसुंदी आणि गटबाजीचा परिणामही या वेळच्या प्रदर्शनावर दिसून आला. नवी मंुबईच्या बांधकाम उद्योगात पटेल ग्रुप, महाराष्ट्रीयन बिल्डर्स आणि उर्वरित असे सरळ तीन गट पडले आहेत. सध्याच्या परिस्थितीत बीएएनएमवर पटेल ग्रुपचे वर्चस्व आहे. उर्वरित पंजाबी, सिंधी व गुजराती व्यावसायिकांना हाताशी धरून पटेल ग्रुपने रियल इस्टेट क्षेत्रात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रीयन बिल्डर्संनी या प्रदर्शनापासून फारकत घेतल्याचे दिसून आले आहे.
................
घरांच्या मार्केटिंगसाठी परदेशी मुली
मालमत्ता प्रदर्शनाच्या माध्यमातून तरी ग्राहक घरांच्या खरेदीसाठी पुढे येतील, असे विकासकांना वाटते. त्यामुळेच दरवर्षी अगदी हायटेक पध्दतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. घरांच्या मार्केटिंगसाठी देश - विदेशातील मुलींना आणले जाते. अत्याधुनिक पध्दतीने सजावट केलेल्या स्टॉलच्या स्वागत कक्षावर दिसणार्‍या देश-विदेशातील या मुली पाहून सर्वसामान्यांची भंबेरी उडते. आपण मालमत्ता प्रदर्शनात फिरतोय याचा अनेकांना क्षणभर विसर पडावा, असाच हा सोहळा असतो. त्यामुळे या सोहळ्यात मालमत्ता खरेदी करणर्‍यांपेक्षा बघ्यांचीच अधिक गर्दी असल्याचे पाहावयास मिळते.

Web Title: Property Performance: Window

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.