आरोग्य सेवकांच्या पदोन्नत्या अडकल्या लालफितीत
By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:37+5:302016-04-26T00:16:37+5:30
सहा महिन्यांपासून होतोय फाईलींचा प्रवास

आरोग्य सेवकांच्या पदोन्नत्या अडकल्या लालफितीत
स ा महिन्यांपासून होतोय फाईलींचा प्रवासनाशिक : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य सेवक पदावर कार्यरत असलेल्या सुमारे २९ कर्मचार्यांना आरोग्य सहायक पदावर पदोन्नती देण्याच्या प्रस्तावाची फाईल गेल्या सहा महिन्यांपासून फाईलींच्या प्रवासात अडकल्याचे वृत्त आहे.महाराष्ट्र दिनापर्यंत या पदोन्नत्यांची कार्यवाही न झाल्यास हे २९ आरोग्य सेवक आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे. गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेवकांनी पदोन्नतीची मागणी वारंवार करूनही आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे कर्मचारी सेवानिवृत्त झाले व काही होणार आहेत. काही अपेक्षेने हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावले आहेत. वारंवार चर्चा व बैठका होऊन ही पदोन्नतीची कार्यवाही होत नाही. गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य विभागात रिक्त असलेल्या २९ आरोग्य सहायकांच्या पदांवर आरोग्य सेवकांना पदोन्नती देण्याची नस्ती परिपूर्ण प्रस्तावासह जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच आरोग्य विभाग आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयादरम्यान फाईलींच्या प्रवासात अडकली आहे. पात्र प्रत्येक आरोग्य सेवकाचा पदोन्नतीचा प्रस्ताव परिपूर्ण असूनही या ना त्या कारणाने ही पदोन्नतीची फाईल लालफितीत अडकली असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. त्यामुळे या २९ आरोग्य सेवकांना पदोन्नती न दिल्यास १ मे महाराष्ट्र दिनापासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण करणार असल्याचे संघटनेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्याचप्रमाणे संघटनेच्या अन्य मागण्यांमध्ये कालबद्ध पदोन्नती व स्थायित्व पदोन्नती, दुसर्या व चौथ्या शनिवारसाठी सार्वजनिक सुटी मिळावी, या मागण्यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)