शहरं
Join us  
Trending Stories
1
Dombivli MIDC Explosion डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा आग, इंडो अमाईन कंपनीत स्फोट, नागरिकांत घबराट
2
सरकार स्थापनेनंतर रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी, घेण्यात आला मोठा निर्णय
3
मोठी बातमी: पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; प्रवक्त्याच्या सूचक पोस्टने चर्चांना उधाण
4
रील, ४० हजार फॉलोअर्स अन् अफेअर... ५ मुलांची आई बॉयफ्रेंडसह फरार; म्हणते, नवऱ्याला कंटाळली
5
'विक्रम'वीर झाम्पा! ऑस्ट्रेलियन स्टार खेळाडूनं इतिहास रचला; असं करणारा पहिला खेळाडू ठरला
6
"राग येणं स्वाभाविक पण.."; कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला चिराग पासवान यांचा सल्ला
7
Rahul Gandhi : राम मंदिर बांधले तरी अयोध्येत भाजपाचा पराभव का झाला?; राहुल गांधींनी सांगितलं मोठं कारण
8
Sonakshi Sinha Wedding: सोनाक्षी सिन्हा-जहीर इक्बाल रजिस्टर मॅरेज करणार? 23 जूनला होणार सेलिब्रेशन
9
सरपंच ते आमदार... आता ओडिशाचे मुख्यमंत्री; मोहन चरण माझी यांचा राजकीय प्रवास
10
१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
11
पतीच्या कायदेशीर कारवाईनंतर दलजीत कौर पुन्हा केनियाला गेली, दुसरं लग्न टिकवणार?
12
"हे 'नालायक' व्यक्तीच करू शकते", धर्माचा अपमान, अकमलचा माफीनामा पण भज्जीचा संताप कायम
13
Chandrababu Naidu Oath Ceremony : चंद्राबाबू नायडू आज चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; PM नरेंद्र मोदी, अमित शाह उपस्थित राहणार
14
आमदार राजेंद्र राऊत यांच्या मध्यस्थीने मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची शक्यता
15
पाकिस्तानने सामना जिंकला, पण मोहम्मद रिझवानच्या नावे झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम
16
जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये लष्कराच्या चौकीवर दहशतवाद्यांकडून गोळीबार; ३ दिवसांत तिसऱ्यांदा हल्ला
17
लग्नाच्या चर्चांवर अखेर सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन, म्हणाली- "हा माझा निर्णय आहे..."
18
प्रसिद्ध पापाराझीने केली साऊथ इंडस्ट्रीची पोलखोल; साऊथ स्टारच्या नम्र वागण्याला म्हटलं ढोंग
19
९ ठार! वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; रोहितची पत्नी भावूक, म्हणाली...
20
T20 WC 2024: टीम इंडिया आज तरी चूक सुधारणार? अमेरिकेविरूद्ध 'या' खेळाडूचा पत्ता कट?

पदोन्नतीत पुन्हा आरक्षण; नितीशकुमार यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:19 PM

पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (यू) व भाजपा यांची युती आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीही जोरात कामाला लागली आहे.

पाटणा : पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा जनता दल (यू) व भाजपा यांची युती आणि काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलाच्या महाआघाडीही जोरात कामाला लागली आहे. जागावाटपाबाबत युती व आघाडी यांच्यात फारसे मतभेद राहिले नसले तरी आता विविध मुद्द्यांंवरून एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या (एससी व एसटी) कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे.दलित व आदिवासी यांना आपल्या बाजूने खेचण्यासाठीच नितीशकुमार यांनी हे पाऊ ल उचलले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ जून रोजी सरकारी कर्मचाºयांना पदोन्नतीमध्ये आरक्षण सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. विविध राज्यांच्या उच्च न्यायालयांनी अनुसूचित जाती-जमातींतील कर्मचाºयांच्या पदोन्नतीविरुद्ध निकाल दिल्याने काही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.उच्च न्यायालयाच्या निकालामुळे पदोन्नतीची प्रक्रियाच थांबल्याची तक्रार राज्य सरकारांनी केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी अनुसूचित जाती-जमातीतील कर्मचाºयांच्या पदोन्नतीला क्रिमी लेअरचा मुद्दा लागू होऊ शकत नाही, असे प्रतिपादन केंद्र सरकारतर्फे करण्यात आले होते. त्यावर हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवताना, त्याचा निर्णय येईपर्यंत अनुसूचित जाती व जमातींच्या कर्मचाºयांच्या पदोन्नतीला न्यायालयाने संमती दिली.त्याआधारे नितीशकुमार यांनी पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. बिहारमध्ये महाआघाडीच्या बाजूने वातावरण आहे आणि त्याचा फटका जनता दल (यू) व भाजपा युतीला बसू नये, हे या निर्णयाचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. याचा निवडणुकांमध्ये राजकीय फायदा मिळू शकेल, असे त्यांना वाटत आहे. (वृत्तसंस्था)तर वटहुकूम काढणार?सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा निर्णय कदाचित विरोधात गेला, तर मात्र नितीशकुमार यांची अडचण होईल आणि त्यामुळे मधील काळात ज्यांना पदोन्नती मिळाली, ती रद्द होऊ शकेल. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमातींचे पदोन्नतीतील आरक्षण रद्द केले वा बेकायदा ठरविले, तर तर केंद्र सरकार वटहुकूम काढून आरक्षण कायम ठेवेल, असे समजते. केंद्रीय मंत्री व बिहारमधील नेते रामविलास पासवान यांनी तसे स्पष्टपणे म्हटले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहार