शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांआधी आश्वासनं आणि घोषणांचा पाऊस; राहुल गांधींचं मोदींच्या दौऱ्यावर खोचक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 13:05 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खोचक टीका केली आहे.

ठळक मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खोचक टीका केली आहे.‘हवामान अंदाज- निवडणुकांच्या आधी होणार आश्वासनांचा पाऊस’ अशा आशयाचं खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

गांधीनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. आज मोदी जवळपास सात लाख कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदी काय बोलणार याकडे सगळयांचं लक्ष लागलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खोचक टीका केली आहे. ‘हवामान अंदाज- निवडणुकांच्या आधी होणार आश्वासनांचा पाऊस’ अशा आशयाचं खोचक ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. याच निवडणुकांच्या निमित्ताने भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याची एकही संधी राहुल गांधी सोडताना दिसत नाहीत. राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर असताना त्यांनी मोदींवर कडाडून टीका केली होती. आज पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून पहिल्यांदाच गुजरातमध्ये निवडणुका होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरात मॉडेल समोर ठेवून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. त्याचमुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी आणि भाजपासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 

ट्रम्प यांच्या ट्विटवरूनही केली मोदींवर टीकारविवारीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाकिस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासंबंधीच्या ट्विटवरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली होती. मोदीची, घाई करा. डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा गळाभेट हवी आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली होती.

गुजरातमध्ये मोदी सात लाख कार्यकर्त्यांना करणार संबोधितआगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गुजरात गौरव यात्रा समापन संमेलनाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. या संमेलनासाठी जवळपास 7 लाख कार्यकर्ते एकत्र येणार असल्याचा दावा भाजपानं केला आहे. यापूर्वी अशा पद्धतीनं कोणत्याही पक्षाच्या मेळाव्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र जमलेले नाहीत, त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे भाजपाचं म्हणणं आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भट गावात गुजरात गौरव महासंमेलनात जवळपास सात लाख भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अन्य नेतेमंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. गेल्या आठवड्यात मोदी यांनी राजकोट, वडनगर, गांधीनगरसारख्या परिसरात अनेक योजनांचे भूमिपूजन केले तर काही योजनांचा शुभारंभदेखील केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातElectionनिवडणूक