शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

"सर्वांना दिलेल्या शब्दानुसार; 2020 संपण्याआधीच...!" कोरोना लसबाबत सिरमकडून 'महत्वाची' घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 18:31 IST

आॅक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनिकातर्फे विकसित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसींचे उत्पादन सुुरु आहे.

पुणे : सिरम इन्स्टिट्यूटने ‘कोविशिल्ड’ लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सोमवारी अर्ज केला. याबाबतची माहिती सिरम इन्स्टिट्यू आॅफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी ट्विट करुन दिली. केंद्र सरकारकडून परवानगी मिळाल्यास लसीकरण प्रक्रियेला गती मिळू शकणार आहे.

इंग्लंडमधील आॅक्सफर्ड विद्यापीठ आणि अ‍ॅस्ट्राझेनिकातर्फे विकसित केल्या जाणाऱ्या कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसींचे उत्पादन सुुरु आहे. सध्या सिरममध्ये दर महिन्याला ५ ते ६ कोटी डोस तयार होत आहेत. जानेवारीपासून १० कोटी डोसचे उत्पादन केले जाणार आहे. लस उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ नोव्हेंबर रोजी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली होती.

आपत्कालीन परिस्थितीत ‘कोव्हिशिल्ड’ लसीच्या वापरासाठी येत्या दोन आठवड्यांमध्ये औषध महानियंत्रकांकडे अर्जाद्वारे मागणी करणार असल्याचे मोदी यांच्या भेटीनंतर आदर पुनावाला यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार सोमवारी केंद्र सरकारकडे परवानगी मागितल्याची माहिती पुनावाला यांनी व्टिट करुन दिली. यापूर्वी फायझर या अमेरिकेतील कंपनीने दोन दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे आपत्कालीन परिस्थितीत लसीच्या वापराला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे.

‘सर्वांना दिलेल्या शब्दानुसार, २०२० हे वर्ष संपण्यापूर्वी सिरमने भारतात तयार होत असलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ या पहिल्यावहिल्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. यामुळे हजारो जणांचे प्राण वाचू शकणार आहेत. आम्हाला मिळत असलेल्या भरघोस पाठिंब्याबाबत मी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो’, असे पुनावाला यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे.

कोरोनावरील लस वितरणासाठी सिरमकडून भारतालाच प्राधान्य दिले जाणार आहे. जुलै २०२१ पर्यंत केंद्र सरकारला ३० ते ४० कोटी डोस पुरवण्याचे लक्ष्य सिरम इन्स्टिट्यूटसमोर आहे. त्यादृष्टीने उत्पादन प्रक्रियेला गती दिली जाणार आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याMedicalवैद्यकीयHealthआरोग्य