नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता- प्रणव मुखर्जी
By Admin | Updated: January 5, 2017 23:29 IST2017-01-05T23:29:10+5:302017-01-05T23:29:10+5:30
नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मांडलं आहे.

नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता- प्रणव मुखर्जी
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 5 - नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मंदावण्याची शक्यता असल्याचं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी मांडलं आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून, झालेली हानी भरून काढण्यासाठी आपल्याला जास्त खबरदारी घ्यावी लागणार असल्याचं प्रतिपादनही प्रणव मुखर्जी यांनी केलं आहे.
राष्ट्रपती भवनातून राज्यपालांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी हा गंभीर इशारा दिला आहे. नोटाबंदीमुळे उद्भवलेली स्थिती सुधारेपर्यंत गरिबांचे किती हाल होतील याची मला खात्री नाही, असंही ते म्हणाले आहेत. नोटाबंदीला कंटाळलेली जनता गरिबी, बेरोजगारी आणि शोषणाच्या विरोधात आवाज उठवण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
तत्पूर्वी हैदराबादमध्ये बोलताना मात्र प्रणव मुखर्जी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल आशा पल्लवित करण्याचं वक्तव्य केलं होतं. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली प्रगती झाली, असं प्रणव मुखर्जी म्हणाले होते. नोटाबंदीमुळे बेहिशेबी मालमत्ता आणि भ्रष्टाचार रोखला जाईल, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.