कथडा परिसरात बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम
By Admin | Updated: May 23, 2016 00:10 IST2016-05-22T19:39:35+5:302016-05-23T00:10:47+5:30
नाशिक : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरातील कथडा येथील बीसीजीएस हौसिंग सोसायटी, धम्मनगर येथे गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात आले.

कथडा परिसरात बुद्ध जयंतीनिमित्त कार्यक्रम
नाशिक : भगवान गौतम बुद्ध जयंतीनिमित्त जुने नाशिक परिसरातील कथडा येथील बीसीजीएस हौसिंग सोसायटी, धम्मनगर येथे गौतम बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात येऊन पारितोषिक वितरण करण्यात आले.
बुद्ध जयंतीनिमित्त विविध गटात संगीत खुर्ची, चमचा लिंबू, वेशभूषा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात महिला, मुली व मुले या गटाचा सहभाग होता. संगीत खुर्ची (मुली) जान्हवी जाधव, आकांक्षा पगारे, मेधा जाधव, प्रतीक्षा बकरे. मुले : राज विश्वकर्मा, आरुष पवार. संगीत खुर्ची (महिला) : मनीषा निरभवणे, सरिता अहिरे. चमचा लिंबू (मुली) : प्रियंका लोखंडे, जान्हवी जाधव, दिव्या काळे, श्रद्धा अहिरे. मुले : कार्तिक जाधव, बाळा फसाळे. वेशभूषा स्पर्धेत : आर्या पगारे, मेधा जाधव, शृती शिंदे, प्रियंका लोखंडे आदिंना पारितोषिके देण्यात आली. यावेळी निशिकांत पगारे, राजेंद्र अढांगळे, राजेंद्र बस्ते, बाळासाहेब शार्दुल, साहेबराव शिंदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)