पंजाबमधील २५ शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेशी संबंधित अटक वारंट निघाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 22:19 IST2025-01-16T22:17:51+5:302025-01-16T22:19:18+5:30

पंजाबमध्ये तीन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्यात आला होता.

problems of 25 farmers in Punjab increase, arrest warrants issued related to the security of Prime Minister Narendra Modi | पंजाबमधील २५ शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेशी संबंधित अटक वारंट निघाले

पंजाबमधील २५ शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेशी संबंधित अटक वारंट निघाले

पंजाबमध्ये तीन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रस्ता अडवण्यात आला होता. या प्रकरणी आता शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी २५ शेतकऱ्यांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२२ रोजी पंजाबमधील फिरोजपूरच्या दौऱ्यावर होते तेव्हा त्यांच्या सुरक्षेचे उल्लंघन झाले होते. ज्या २५ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे त्यात भारतीय किसान युनियन आणि क्रांतिकारी पेंडू मजदूर युनियनचे २५ सदस्य आहेत.

अजबच! बँकेत झाली चोरी, अधिकाऱ्यांनी आपला पगार कापून केली भरपाई, कारण काय?

सुरक्षेच्या उल्लंघनाच्या दुसऱ्या दिवशी, ६ जानेवारी २०२२ रोजी, अज्ञात व्यक्तींविरुद्ध आयपीसीच्या कलम २८३ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला, तो जामीनपात्र गुन्हा आहे. भाजप नेत्यांनी एफआयआरवर आक्षेप घेतल्यानंतर तीन सदस्यीय एसआयटी स्थापन करण्यात आली. तपासाच्या आधारे, आरोपींवर कलम ३०७, ३५३, ३४१, १८६ , १४९ आणि राष्ट्रीय महामार्ग कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कायदा. कायद्याच्या कलम ८-ब सह अतिरिक्त आरोप जोडले आहे.

एफआयआरमध्ये बीकेयू क्रांतिकारीचे सरचिटणीस बलदेव सिंह झिरा, इतर युनियन सदस्य आणि क्रांतिकारी पेंडू मजदूर युनियनचे नेते यांच्यासह २६ जणांची नावे आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. यातील एक आरोपी मेजर सिंह यांचा मृत्यू झाला आहे, २५ जणांना अटक होण्याची शक्यता आहे.

३ जानेवारी २०२५ रोजी फिरोजपूर न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटनुसार, अनेक समन्स आणि वॉरंट असूनही आरोपी न्यायालयात हजर झाला नाही. कुलगढी पोलिस स्टेशनच्या स्टेशन हाऊस ऑफिसरला त्याला अटक करून २२ जानेवारीपर्यंत न्यायालयात हजर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Web Title: problems of 25 farmers in Punjab increase, arrest warrants issued related to the security of Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.