शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

'लोकसभा निवडणुकांत समाजमाध्यमांमुळे ४ ते ५% मते फिरण्याची शक्यता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 06:42 IST

लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले.

हैदराबाद : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये ४ ते ५ टक्के मते अन्यत्र वळण्याची शक्यता असल्याने कमी मताधिक्याने निवडून येणाऱ्यांसाठी तो महत्त्वाचा घटक ठरणार आहे असे माहिती तंत्रज्ञानक्षेत्रातील जाणकार टी. व्ही. मोहनदास पै यांनी मंगळवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजही युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत असेही ते म्हणाले.ते म्हणाले की, युवक विशेषत: जे या निवडणुकांत पहिल्यांदाच मतदान करणार आहेत ते समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असतात. त्यातून त्यांना एखादा पक्ष किंवा उमेदवार यांच्याविषयी प्राथमिक माहिती मिळते. पै हे इन्फोसिस या कंपनीचे माजी मुख्य वित्त अधिकारी आहेत. ते म्हणाले की, समाजमाध्यमांतून मिळणाऱ्या माहितीद्वारे आपले विचार पक्के करून युवा मतदारांपैकी ४० ते ५० टक्के लोक त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराला मत देतील. सध्याचे युवक हे टीव्ही न पाहाता व्हिडीओ पाहातात. त्यासाठी ते यू ट्युब, समाजमाध्यमांचा वापर करतात. ते वृत्तपत्र वाचत नाहीत. समाजमाध्यमांवर जे दिसते त्याने युवक प्रभावित होतात. त्यांची मते आपल्याकडे वळविण्यासाठी राजकीय पक्षांनी विविध मार्ग शोधले पाहिजेत. हे युवक कोणत्या गोष्टींतून प्रेरणा घेतात, त्यांना नेमके काय भावते, कोणत्या ठिकाणी जास्त जायला आवडते, ते आपल्या भविष्याबद्दल काय विचार करतात अशा अनेक गोष्टींचा मागोवा राजकीय पक्षांनी घ्यायला हवा.त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांना राजकीय पक्षांनी संदेश पाठविले पाहिजेत. युवकांतील विशिष्ट गटांना डोळ््यांसमोर ठेवून संदेशांची रचना केली पाहिजे. ते संदेश उज्ज्वल भविष्याविषयी सकारात्मक भाष्य करणारे असावेत.राहुल गांधींच्या तोंडी १९९०च्या दशकातील भाषाटी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर भारताला कशी वागणूक मिळते याविषयी युवकांना जाणून घेण्याची प्रचंड इच्छा असते. त्यांना परदेशात जाऊन नोकरी किंवा व्यवसाय करायचा असतो. जगामध्ये भारताचे स्थान उंचावण्यासाठी सरकारने केलेल्या यशस्वी प्रयत्नांच्या कहाण्या जर संदेशरुपात राजकीय पक्षांनी युवकांना पाठविल्या तर ते युवकांना नक्कीच आवडेल. समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात भाजप सर्व राजकीय पक्षांमध्ये आघाडीवर आहे. १९९०च्या दशकात वापरली जाणारी भाषा राहुल गांधी यांच्या तोंडी असल्याने ते युवकांमध्ये फारसे लोकप्रिय नाहीत असेही पै म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSocial Mediaसोशल मीडियाNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी