शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

धोका देत असल्याचा संशय असल्याने प्रेयसीने कापलं प्रियकराचं गुप्तांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 11:51 IST

केरळच्या मल्लपुरम शहरात एका तरुणीने आपल्या 26 वर्षीय प्रियकराचं गुप्तांग कापलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला आपला प्रियकर फसवणूक करत असल्याचा संशय होता. या संशयातूनच तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.

मलप्पुरम - केरळच्या मल्लपुरम शहरात एका तरुणीने आपल्या 26 वर्षीय प्रियकराचं गुप्तांग कापलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला आपला प्रियकर फसवणूक करत असल्याचा संशय होता. या संशयातूनच तिने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, प्रियकराने वेगळी माहिती दिली असून पोलीस तपास करत आहे. पीडित तरुणाला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तांग कापले जाण्याची ही धक्कादायक घटना जिल्ह्यातील कुट्टिपुरम येथील एका लॉजमध्ये घडली आहे. 30 वर्षीय तरुणी आणि पीडित तरुणामध्ये प्रेमसंबंध होते असं सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी तरुणीला अटक केली. अटक केल्यानंतर तरुणीने आपला गुन्हा कबूल केला. छोट्या चाकूच्या मदतीने आपण आपल्या प्रियकरावर हल्ला केला अशी माहिती आरोपी तरुणीने पोलिसांना दिली. 

पीडित तरुणाचीही ओळख पटली आहे. तरुणाचं नाव इरशाद असून पुराथूर येथील राहणारा आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात तरुणाने आपणच आपलं गुप्तांग जखमी करुन घेतल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दोघांनाही लॉजमध्ये एक रुम बूक केला होता. सर्व घटना रुममध्येच घडली आहे. चाकूने झालेल्या हल्ल्यानंतर इरशाद रुममधून बाहेर आला आणि धावत सुटला. लॉजच्या कर्मचा-यांनीच इरशादला रुग्णालयात दाखल केलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पीडित तरुणी घटस्फोटित असून गेल्या अडीच वर्षांपासून इरशादसोबत तिचे प्रेमसंबंध आहेत. पोलिसांच्या सांगण्यानुसार, इरशादरने कोणालाही न सांगता तिच्याशी लग्न केलं होतं आणि अधिकृतपणे त्यांची नोंदणीही केली होती. पोलिसांना शंका आहे की, इरशाद दुस-या तरुणीसोबत लग्न करण्याचा प्लान आखत होता, ज्याची माहिती आरोपी तरुणीला मिळाली होती.  यामुळेच तिने हल्ला करत इरशादचं गुप्तांग कापून टाकलं. 

पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून सध्या तिची चौकशी सुरु आहे. आरोपी तरुणी आणि पीडित तरुणांना वेगवेगळी माहिती दिली असल्याने पोलीस नेमकं तथ्य काय आहे याची माहिती मिळवत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे