शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश हा चांगला निर्णय -अखिलेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 04:27 IST

बसपाचे मौन; समाजवादी पक्षाने मात्र केले स्वागत

लखनौ: प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या हा चांगला निर्णय आहे असे समाजवादी पार्टीचे (सपा) प्रमुख व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. या निर्णयाबद्दल त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन केले आहे.प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाबद्दल सपाचा मित्रपक्ष बहुजन समाज पार्टी (बसपा) व त्याच्या प्रमुख मायावती यांनी अजून काहीच प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, राजकारणात जितके नवे लोक येतील, त्याचा समाजवादी पक्षाला आनंदच होईल.प्रियंका गांधी यांना कॉँग्रेसचे सरचिटणीसपद देऊ न, त्यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व भागाची जबाबदारी दिल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘मायावती व अखिलेश यादव यांचा मी आदर करतो’, असे विधान केले होते. सपा व बसपाला धक्का देणे हा आमचा हेतू नसून, भाजपाला पराभूत करणे, हे दोघांचेही उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले होते. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेसशी आघाडी करणार का या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे मात्र अखिलेश यादव यांनी टाळले.येणाऱ्या लोकसभा निवडणुकांत कर्नाटकामध्ये प्रचारासाठी प्रियंका गांधींनी यावे यासाठी राज्यातील काँग्रेस नेते प्रयत्नशील आहेत. तशी विनंती ते राहुल यांना करणार आहेत. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, प्रियंका गांधी यांच्या व्यक्तिमत्वात त्यांची आजी इंदिरा गांधींचा भास होतो. कर्नाटकातील जनतेने कायमच काँग्रेसला साथ दिली आहे. प्रियंकांनी प्रचार केला तर कर्नाटकामध्ये पक्षाला खूप फायदा होईल असे काँग्रेस नेत्यांना वाटते. माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी कर्नाटकातून निवडणूक लढविली होती.कुंभमेळ्यात करणार स्नानउत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ््यात मौनी अमावास्येला ४ फेब्रुवारी रोजी गंगा नदीत पवित्र स्नान करून प्रियंका गांधी आपल्या राजकीय कारकीर्दीला प्रारंभ करण्याची शक्यता आहे. त्यादिवशी शक्य न झाल्यास १० फेब्रुवारी रोजी वसंत पंचमीला शाही स्नानाचा मुहूर्त गाठला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. राहुल व प्रियंका गांधी हे दोघेही पवित्र स्नान करतील. २००१ साली सोनिया गांधी यांनीही कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान केले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियांका गांधीUttar Pradeshउत्तर प्रदेशAkhilesh Yadavअखिलेश यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेसBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९