लखनौ - काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी सुरुवातीपासूनच धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे. पूर्व उत्तर प्रदेशातील 41 मतदारसंघांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रियंका गांधी यांनी मंगळवारी नॉन स्टॉप बैठकांचा घडाका लावत उत्तर प्रदेशमधीलकाँग्रेस नेत्यांचा क्लास घेतला. यावेळी प्रियंका गांधी यांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अनेक काँग्रेस नेत्यांची फे फे उडाली. काही जणांना तर त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या बुथची संख्याही माहीत नव्हती. प्रियंका गांधी यांची उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसोबतची बैठक मंगळवारी दुपारी 1. 20 वाजता सुरू झाली. तेव्हापासून बुधावारी पहाटे 5 वाजून 15 मिनिटांपर्यत ही बैठक सुरू होता. यादरम्यान, प्रियंका गांधी यांनी तहान भूक विसरून मॅरेथॉन बैठका घेतल्या. या बैठकीदरम्यान फूलपूर येथील कार्यकर्त्यांनी त्यांनी फूलपूर येथून निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला. त्याला उत्तर देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ''मी निवडणूक लढवावी यासाठी अनेक ठिकाणाहून आग्रह होत आहे. मात्र मी निवडणूक लढणार नाही तर संघटना भक्कम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.''
प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेस नेत्यांचा मॅरेथॉन क्लास, प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची उडाली फे फे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 09:24 IST
काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी स्वीकारून राजकारणात सक्रिय झालेल्या प्रियंका गांधी यांनी धडाकेबाज काम करण्यास सुरुवात केली आहे.
प्रियंका गांधींनी घेतला काँग्रेस नेत्यांचा मॅरेथॉन क्लास, प्रश्नांच्या सरबत्तीने अनेकांची उडाली फे फे
ठळक मुद्देपूर्व उत्तर प्रदेशातील 41 मतदारसंघांची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रियंका गांधी यांनी मंगळवारी नॉन स्टॉप बैठकांचा घडाका लावत उत्तर प्रदेशमधील काँग्रेस नेत्यांचा क्लास घेतला प्रियंका गांधी यांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीमुळे अनेक काँग्रेस नेत्यांची फे फे उडाली प्रियंकांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान काँग्रेसच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षात बाहेरून आलेल्या व्यक्तींनाच मोठी पदे मिळत असल्याची तक्रार केली