शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:44 IST

priyanka gandhi congress palestine support bag picture amid hamas israel war

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचे पॅलिस्टाइन प्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. प्रियंका "Palestine" लिहिलेली बॅग घेऊन संसदेत पोहोचल्याचा एक फोटो समोर आला आहे. या बॅगच्या माध्यमाने प्रियांका गांधी पुन्हा एकदा पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ दिसून आल्या. एवढेच नाही तर त्यांनी थेट मेसेजही दिला आहे.

प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच पॅलेस्टाइनचे समर्थन केले आहे, असे नाही. त्यांनी नुकतेच भारतात येऊन गेलेले पॅलेस्टाइनचे राजदूत अबेद एलराजेग अबू जाझर (Abed Elrazeg Abu Jazer) यांची भेटही धेतली होती. यावेळी, पॅलेस्टाइच्या राजदुताने वायनाड लोकसभ निवडणुकीतील विजयाबद्दल प्रियांका गांधी यांचे अभिनंदनही केले होते. 

प्रियंका गांधीनीं दिला असा मेसेज -या भेटीदरम्यान प्रियांका गांधी यांनी पॅलेस्टाइनला असलेले आपले समर्थन स्पष्टपणे प्रकट केले होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यासाठी  पॅलेस्टाइनच्या नागरिकांच्या संघर्षाला समर्थनासंदर्भात भाष्य केले होते. त्या म्हणाल्या, आपण लहाणपणापासूनच पॅलेस्टाइनच्या हितांसाठी जगत आहोत आणि याच्या न्यायावर विश्वास आहे. याशिवाय त्यांनी पॅलेस्टाइनचे नेते यासिर अराफात यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अनेक वेळा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधीपासून त्यांच्या भेटीचाही उल्लेख केला होता.

इस्रायलचा निषेध - पॅलेस्टाइच्या राजदुतांना भेटल्या तेव्हा प्रियांका गांधी यांनी हमास आणि इस्राइल यांच्यात सुरू असलेल्या युद्धावरही भाष्य केले होते. यावेळी त्यांनी, गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायली लष्कराच्या कारावाईचाही निषेध केला. तसेच परिसरात होत असलेला विध्वंसाबद्दल दु:ख व्यक्त केले होते. प्रियांका म्हणाल्या होत्या, ज्याज्या महिलांनी या युद्धात आपले मूल गमावले आहे, त्या सर्व महिलांप्रति मी सहवेदना व्यक्त करते. यावेळी त्यांनी प्रत्येक देशाला इस्राइली सरकारच्या हल्ल्याचा निषेध करण्याचे आणि ते थांबवण्याचे आवाहनही केले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसPalestineपॅलेस्टाइनIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध