Priyanka Gandhi Quarantine, Cook Kovid Patient | प्रियांका गांधी क्वारंटाईन, स्वयंपाकी कोविड रुग्ण

प्रियांका गांधी क्वारंटाईन, स्वयंपाकी कोविड रुग्ण

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या क्वारंटाईन झाल्याचे समजते. गांधी कुटुंबातील उच्च पातळीवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशच्या प्रभारी असलेल्या प्रियांका गांधी यांचा स्वयंपाकी कोविड सकारात्मक निघाल्यामुळे त्यांना २१ सप्टेंबरपर्यंत क्वारंटाईन होण्याचा सल्ला दिला गेला आहे.
या अचानक आलेल्या कारणामुळे प्रियांका गांधी यांना आई सोनिया गांधी यांच्यासोबत अमेरिकेला जाण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा लागला. शेवटच्या क्षणी राहुल गांधी हे आईसोबत गेले. सोनिया गांधी यांची वार्षिक आरोग्य तपासणी होणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनालाही राहुल गांधी हजर राहू शकणार नाहीत. त्यांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीपासून सरकारला शून्य काळात आव्हान देण्याचे ठरवलेले आहे. प्रियांका गांधी या त्यांच्या गुरगावमधील निवासस्थानाहून ल्युटेन्स दिल्लीत लवकरच राहायला जातील.

त्यांचा नवा पत्ता सुजन सिंह पार्कमधील ड्युप्लेक्स अपार्टमेंट असेल. हे पार्क खान मार्केटजवळ अँबेसेडॉर हॉटेलसमोर आहे. हे संकुल लेखक व संपादक खुशवंत सिंग यांचे वडील सर सोभा सिंग यांनी बांधलेले आहे. प्रियांका गांधी या अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून राहतील. राहुल गांधी हे अमेरिकेतून लवकरच परत येतील, असे समजते. सोनिया गांधी तेथेच थांबतील व नंतर प्रियांका गांधी तिकडे जातील.
—————————-

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Priyanka Gandhi Quarantine, Cook Kovid Patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.