प्रियांका गांधी यांची आजपासून बोटीतून गंगायात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:06 IST2019-03-18T06:06:20+5:302019-03-18T06:06:39+5:30
काँग्रेसच्या सरचिटणीस उद्या, सोमवारपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज (अलाहाबाद) ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरू करणार आहे.

प्रियांका गांधी यांची आजपासून बोटीतून गंगायात्रा
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : काँग्रेसच्या सरचिटणीस उद्या, सोमवारपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज (अलाहाबाद) ते वाराणसी अशी गंगायात्रा सुरू करणार आहे. ही यात्रा १४0 किलोमीटरची असून, गंगा किनाऱ्यांवरील गावांमध्येही त्या जातील आणि तेथील जनतेचे म्हणणे ऐकून घेतली. ही यात्रा २० मार्चपर्यंत चालणार असून, आवश्यक त्या ठिकाणी त्या बस व ट्रेनमधूनही प्रवास करणार आहेत.
गंगायात्रेच्या आदल्या दिवशी, रविवारी जनतेला उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भाजपा सरकारने युवक, कष्टकरी वर्ग, शेतकरी, महिलांकडे दुर्लक्ष केले. उत्तर प्रदेशच्या राजकारणाचा पोत बदलण्यासाठी काँग्रेसची निष्ठावान सैनिक या नात्याने मी सामान्यांच्या साथीने लढणार आहे. समाजातील विविध वर्गातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या व्यथा आम्ही या यात्रेत जाणून घेणार आहोत. या लोकांचा आवाज उत्तर प्रदेशमधील भाजपाच्या राजवटीत दडपला गेला आहे.