शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

"हे निकाल आले नसते तर..."; लोकसभेत प्रियंका गांधी यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल, PM मोदींवरही थेट निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 15:36 IST

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, ...

लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान प्रियंका गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जबरदस्त निशाणा साधला आहे. "लोकसभा निवडणुकीचे निकाल असे आले नसते, तर हे लोक संविधान बदलायलाही तयार होते," असे प्रियांका गांधी वाड्रा यांनी म्हटले आहे. वायनाडमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकसभेतील हे त्यांचे पहिलेच भाषण होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवरही थेट टीका केली. "आजच्या राजाला वेष बदलणे तर माहीत आहे, मात्र जनतेत जाण्याची आणि टीका ऐकण्याची हिम्मत नाही," असे प्रियांका म्हणाल्या.

प्रियांका म्हणाल्या, आम्ही संविधानाची ज्योज जळताना बघितली आहे आणि हे एक सुरक्षा कवच असल्याचेही समजले आहे. एक असे सुरक्षा कवच, जे देशातील नागरिकांना सुरक्षित ठेवते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कवच आहे. मात्र, दुःखाची गोष्ट म्हणजे,  आपले सत्ताधारी पक्षातील सहकारी, जे मोठ मोठ्या गप्पा मारतात, त्यांनी गेल्या 10 वर्षांत हे सुरक्षा कवच तोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला. संविधानात सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाचे वचन आहे. हे सुरक्षा कवच तोडण्याचे काम सुरू झाले आहे. लॅटरल एन्ट्री आणि खासगीकरणाच्या माध्यमाने हे सरकार आरक्षण कमकुवत करण्याचे काम करत आहे.

प्रियांका पुढे म्हणाल्या, जर लोकसभा निवडणुकीत हे निकाल आले नसते तर, यांनी संविधान बदलायलाही सुरुवात केली असती. खरे तर, हे वारंवार संविधान-संविधान करत आहेत, कारण यांना, देशातील जनता संविधान बदू देणार नाही, हे माहीत झाले आहे. यांना पराभूत होता होता हे लक्षात आले आहे.

पंतप्रधान मोदींवर निशाणा - पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना प्रियांका म्हणाल्या, "पंतप्रधान संविधान कपाळावर लावतात, पण जेव्हा न्यायासाठी आवाज येतो, तेव्हा त्यांच्या कपाळावर सुरकुतीही नसते. भारतीय राज्यघटना हे संघाचे विधान नाही. हे त्यांना समजलेले नाही. करोडो देशवासीयांच्या हृदयात एकमेकांबद्दल प्रेम आहे, द्वेष नाही. यांच्या फुटीरतावादी धोरणांचे परिणाम आपण रोज पाहतो. राजकीय फायद्यासाठी संविधान तर सोडाच, पण देशाची एकात्मताही पणाला लावतील. संभलमध्ये पाहिले, मणिपूरमध्ये पाहिले. ते म्हणतात की देशाचे वेगवेगळे भाग आहेत. पण आपले संविधान सांगते की, हा देश एक आहे आणि एकच राहील. जिथे अभिव्यक्तीचे संरक्षक कवच होते, तिथे त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. सत्ताधारी पक्ष 75 वर्षांसंदर्भात बोलतात. पण या वर्षांत राज्यघटनेची ज्योत कधीही मंदावली नाही. जनतेने निर्भयपणे निदर्शने केले. ती संतप्त झाल्यावर तिने सरकारला आव्हान दिले. बड्या नेत्यांवरही आरोप केले. पण आज हे वातावरण नाही. आज जनतेला सत्य बोलण्यापासून रोखले जाते. पत्रकार असो की विरोधी पक्षनेते, सर्वांची तोंडे बंद केली जातात. असे भीतीचे वातावरण ब्रिटिश सरकारच्या काळात होते. एवढेच नाही, तर "आजचे राजे भेष तर बदलतात, पण ना जनतेत जातात, ना टीका ऐकण्याची हिंमत आहे," असेही प्रियांका म्हणाल्या.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी