Priyanka Gandhi UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 'महिलाराज'चे संकेत! काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावे पाहून भाजपाला घाम फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 12:24 PM2022-01-13T12:24:07+5:302022-01-13T12:24:39+5:30

Priyanka Gandhi UP Election 2022 Congress : प्रियंका गांधींनी जाहीर केली युपी निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर, १२५ पैकी ५० महिलाच.

priyanka gandhi announces 125 congress candidates 50 women tickets for up elections | Priyanka Gandhi UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 'महिलाराज'चे संकेत! काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावे पाहून भाजपाला घाम फुटणार

Priyanka Gandhi UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 'महिलाराज'चे संकेत! काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावे पाहून भाजपाला घाम फुटणार

googlenewsNext

Priyanka Gandhi UP Election 2022 Congress :  उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी (UP Elections 2022) काँग्रेसने पहिली यादी (Congress First List) जाहीर केली आहे. काँग्रेसच्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत ५० महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. या महिलांमध्ये काँग्रेसकडून यांनी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईलाही उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान त्या त्यांची लढाई लढू शकतील, त्यामुळे त्यांना तिकिट देण्यात आल्याचं प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) म्हणाल्या.

काँग्रेसनं उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी १२५ उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर केली आहे. १२५ उमेदवारांमध्ये ५० महिला उमेदवारांना काँग्रेसनं संधी दिली आहे. "आमच्या १२५ उमेदवारांच्या यादीमध्ये ४० टक्के महिला आणि ४० टक्के तरुणवर्ग आहे. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे आणि आम्हाला राज्यात नव्या राजकारणाची सुरूवात करायची आहे," असं प्रियंका गांधी म्हणाल्या.


आमच्या यादीत ज्या महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यापैकी काही पत्रकार आहेत, काही संघर्ष करत असलेल्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या आणि ज्यांना खुप अत्याचार सहन करावे लागले अशा महिलांचाही समावेश असल्याचं त्या म्हणाल्या. आम्हाला अत्याचार सहन करणाऱ्यांचा आवाज बनायचं असल्याचं सांगत उन्नाव पीडितेच्या आईलाही उमेदवारी जाहीर केली. त्या आपल्या संघर्ष पुढेही सुरू ठेवतील, ज्यांच्या मुलीसोबत अत्याचार झाला, त्यांच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यात आलं, तिच सत्ता त्यांना मिळावी म्हणून त्यांना संधी दिल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्या.

सीएए-एनसीआरमधील आंदोलकालाही संधी
CAA-NRC विरोधात आंदोलनात सहभागी असलेल्या सदफ जाफरचाही पक्षाच्या पहिल्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सदफ जाफरने CAA-NRC दरम्यान खूप संघर्ष केला होता. पोस्टरमध्ये त्यांचा फोटो छापून सरकारने त्याला त्रास दिला. माझा संदेश आहे की तुमच्यावर अत्याचार होत असतील तर तुमच्या हक्कासाठी लढा. काँग्रेस अशा महिलांच्या पाठीशी आहे, असंही त्या म्हणाल्या.

Web Title: priyanka gandhi announces 125 congress candidates 50 women tickets for up elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.