प्रियंका चोप्रा 'बाँड'च्या भूमिकेत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 22:14 IST2016-05-23T22:01:37+5:302016-05-23T22:14:56+5:30

बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री प्रियंका चोप्रा लवकरच हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे.

Priyanka Chopra plays 'Bond'? | प्रियंका चोप्रा 'बाँड'च्या भूमिकेत ?

प्रियंका चोप्रा 'बाँड'च्या भूमिकेत ?

 
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 -  बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्री प्रियंका चोप्रा लवकरच हॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. आगामी चित्रपटात ती बाँड गर्लची भूमिका साकारण्याची शक्यता असून, अभिनयानं ती अनेकांना घायाळ करण्याच्या तयारीत आहे. टि्वटरवरून तिनं चाहत्यांना अशा प्रकारचे संकेत दिले आहेत. "शंका आहे, पण जग तयार आहे फीमेल बाँडला पाहण्यासाठी" अशा प्रकारचं टि्वट करून तिनं अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. सध्या ती बेवॉच चित्रपटात मुख्य नकारात्मक भूमिका साकारणार आहे.  
 
सिनेमात हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रॉक मुख्य भूमिकेत आहे. प्रियंका चोप्रानं क्वांटिकोच्या दुस-या पर्वाचं चित्रीकरण पूर्ण केलं असून, बेवॉच या सिनेमाचं चित्रीकरण अंतिम टप्प्यात आलं आहे. तिच्या टि्वटमुळे फीमेल बाँडच्या भूमिकेसाठी तिला फार उत्सुकता लागूल राहिली असल्याची आता चर्चा आहे.
अमेरिकेतल्या कॉम्प्लेक्स मासिकाच्या कव्हरपेजवर तिच्या फोटोसकट तिची मुलाखत झळकली आहे. याबाबत तिनं कॉम्प्लेक्स मासिकाच्या संपादकांचे आभारही मानले आहेत. या मासिकाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मुलाखतीत तिने स्वतःचा विश्वसुंदरी ते हॉलिवूडपटापर्यंतचा प्रवास अतिशय रोमांचक पद्धतीनं मांडला आहे. मासिकातून प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करताना तिला आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात आणि बॉलिवूड ते हॉलिवूडचा प्रवास उलगडला आहे. 
   

Web Title: Priyanka Chopra plays 'Bond'?