केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी वाड्रा यांच्यात वाद सुरू असल्याचा मोठा दावा केला आहे. "लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आपल्या कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले आहेत,' असे बिट्टू यांनी म्हटले आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
एनडीटीव्हीसोबत बोलताना बिट्टू यांना, व्हीबी जी राम जी विधेयकाविरोधात काँग्रेसच्या निदर्शनाच्या तयारीसंदर्भात विचारले असता, ते म्हणाले, "त्यांच्याकडे लोक आहेत, निदर्शनासाठी? त्यांना महात्मा गांधींशी काही एक देणे-घेणे नाही. जे त्यांच्या नावाशी जोडले गेले आहे, त्या गांधींना लोक विसरले आहेत. आणि बापू गांधी होते आणि राहतील. राहुल गांधी कुठे आहेत? मी त्यांचे फोटो जर्मनीत बघत होतो. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, जे देशहितासाठी जगभर फिरत असताना आणि राहुल गांधी मात्र केवळ पर्यटनासाठी परदेशात जातात."
बिट्टू पुढे म्हणाले, "संसदेतील प्रियांका गांधींच्या भाषणाची तुलना राहुल गांधींच्या भाषणाशी केली गेल्याने ते नाराज झाले आहेत. याच नाराजीतून कुटुंब आणि पक्षाशी वाद घालून ते परदेशात गेले आहेत. मात्र, या आरोपांवर काँग्रेस पक्षाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
याशिवाय, भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही 'टीम प्रियांका विरुद्ध टीम राहुल' असा उघड संघर्ष सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच, ओडिशातील ज्येष्ठ काँग्रेस नेते मोहम्मद मुकीम यांनी सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत भाजपने दावा केला आहे की, या पत्रात 'खर्गे हटवा, प्रियांका यांना आणा' अशी मागणी करण्यात आली असून, पक्षाच्या विचारधारेवर आणि नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Web Summary : Minister Ravneet Singh Bittu claims Rahul Gandhi argued with family, went abroad. BJP alleges 'Team Priyanka vs Team Rahul' conflict. Congress silent.
Web Summary : मंत्री रवनीत सिंह बिट्टू का दावा है कि राहुल गांधी परिवार से झगड़ा करके विदेश गए। बीजेपी का आरोप है 'टीम प्रियंका बनाम टीम राहुल' संघर्ष। कांग्रेस चुप।