शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

karnataka assembly elections 2018: काँग्रेसचा सर्वात श्रीमंत युवा उमेदवार, 1 हजार कोटींची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 08:45 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाड्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट दिलं आहे.

बंगळुरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी धनाढ्य उमेदवारांना निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. भाजपा, काँग्रेससह जवळपास सर्वच पक्षांनी श्रीमंत उमेदवारांना निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. आजतकच्या वृत्तानुसार, काँग्रेसने दिलेल्या उमेदवारापैकी सर्वात श्रीमंत उमेदवार प्रिया कृष्णा आहे. त्यांच्याकडे 1020.5 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

कर्नाटक निवडणुकीत स्वतःला सिद्ध करू पाहणाऱ्या चेहऱ्यांमध्ये काँग्रेसचे तीन उमेदवार सर्वात श्रीमंत आहेत. प्रिया कृष्णा यांच्याशिवाय एम.टी.बी. नागाराजू, डी.के शिवकुमार आणि अनिल लाड यांचंही श्रीमंत उमेदवारांच्या यादीत नाव आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार प्रिया कृष्णा यांनी नामांकन पत्राबरोबर दाखल केलेल्या शपथ पत्रात 1020.5 कोटींची संपत्ती असल्याची घोषणा केली आहे. याचबरोबर काँग्रेसचे उमेदवार एम.टी.बी नागाराजू यांच्याकडे 709.3 कोटींची संपत्ती आहे. राज्य सरकारचे मंत्री डी.के.शिवकुमार यांनाही काँग्रेसने तिकिट दिलं आहे. त्यांच्याकडे 619.8 कोटी रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसच्या श्रीमंत उमेदवारांच्या यादीत बेल्लारी सिटीचे उमेदवार अनिल लाड यांचंही नाव आहे. ते 342.2 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. 

भाजपानेही दिली श्रीमंत उमेदवारांना तिकिटं

भाजपानेही कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी  धनाढ्य  उमेदवारांना तिकिट दिलं आहे. कर्नाटकमध्ये के.आर पुरा जागेसाठी भाजपाचे उमेदवार नंदीश रेड्डी पक्षाचे सर्वात श्रीमंतर उमेदवार आहेत. त्यांच्याकडे 303.6 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसंच 11 कार व 1 ट्रॅक्टर आहे. 

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस