शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 05:59 IST

विमानतळांच्या  एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत.

ठळक मुद्देपीपीपी तत्त्वावर चालविल्या जात असलेल्या विमानतळात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, कोची, अहमदाबाद, लखनौ आणि मंगळुरू यांचा समावेश आहे

नवी दिल्ली : केंद्राने रोखीकरण योजनेची घोषणा केल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने १३ विमानतळांच्या खासगीकरणाला गुरुवारी मंजुरी दिली. यातील सहा मोठे आणि सात लहान विमानतळांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सहा मोठ्या विमानतळांमध्ये अमृतसर, भुवनेश्वर, इंदौर, रायपूर, त्रिची आणि वाराणसी यांचा समावेश आहे, तर सात लहान विमानतळांमध्ये हुबळी, तिरुपती, महाराष्ट्रातील औरंगाबाद, जबलपूर, कांगरा, कुशीनगर आणि गया यांचा समावेश आहे. सरकारला खासगी क्षेत्रात २०२४ पर्यंत ३,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.

विमानतळांच्या  एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत. विमानतळ प्राधिकरण आता लिलावाचे दस्तऐवज तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. जेणेकरून पुढीलवर्षीपर्यंत प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल. वाराणसी - कुशीनगर - गया या स्थळांना पर्यटनामुळे लिलावात महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. याशिवाय वाराणसी हेही मोठे शहर असल्याने साहजिकच त्याकडेही बोली लावणाऱ्यांचा अधिक कल असेल. लहान विमानतळ हे मोठ्या विमानतळांसोबत एकत्रीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. सार्वजनिक - खासगी भागीदारीमध्ये (पीपीपी) खासगी कंपनी विमानतळाचा विकास आणि विस्तार करेन. मात्र, याची मालकी सरकारकडेच राहील.

पीपीपी तत्त्वावर चालविल्या जात असलेल्या विमानतळात हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली, मुंबई, कोची, अहमदाबाद, लखनौ आणि मंगळुरू यांचा समावेश आहे. अदानी समूह लवकरच जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम विमानतळ ताब्यात घेणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळाचीही उभारणी करणार आहे.

टॅग्स :AdaniअदानीAirportविमानतळairplaneविमान