विजयपुरा : कर्नाटकच्या विजयपुरा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील बालेश्वर तालुक्यातील मंगलुरु गावात रविवारी दुपारी एका खासगी मिनी विमानाचा भीषण अपघात झाला. हे विमान गावातील एका मोकळ्या मैदानात कोसळले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने पायलटसह त्यातील दोन्ही प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेले प्राथमिक माहितीनुसार, हे मिनी विमान हवेत असताना तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विमानाने नियंत्रण गमावल्यानंतर ते मंगलुरु गावाजवळील एका मोकळ्या शेतात जोराने आदळले. विमानाचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तातडीने मदतीसाठी धावले.
जीवितहानी टळलीविमान जमिनीवर आदळल्याने त्याचा दर्शनी भाग आणि पंखांचे नुकसान झाले आहे. मात्र, विमानातील वैमानिक आणि प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही, त्यांना तातडीने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. विमानाने लोकवस्ती असलेल्या भागात न कोसळता रिकाम्या मैदानाचा आधार घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हे विमान कोणाचे होते, कुठून कुठे जात होते आणि अपघाताचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास नागरी विमान वाहतूक संचालनालय कडून केला जाण्याची शक्यता आहे.
Web Summary : A private plane crashed in Vijayapura, Karnataka, but pilot and passengers miraculously survived. The plane crash landed in a field after a suspected technical malfunction. All occupants were safely evacuated. Authorities are investigating the cause.
Web Summary : कर्नाटक के विजयपुरा में एक निजी विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, लेकिन पायलट और यात्री चमत्कारिक ढंग से बच गए। तकनीकी खराबी के कारण विमान एक खेत में दुर्घटनाग्रस्त हो गया। सभी यात्रियों को सुरक्षित निकाला गया। अधिकारी कारण की जांच कर रहे हैं।