शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

चोक्सीला आणण्यास गेलेले अधिकारी रिकाम्या हाती परत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2021 6:21 AM

मेहुल याला जामीन देण्यास डोमिनिका न्यायालयाने नकार दिला आहे.

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटी रुपयांचा घोटाळा करून फरार झालेला आरोपी मेहुल चोक्सी याला डोमिनिका येथून भारतात आणण्यासाठी तिथे गेलेले भारतीय अधिकाऱ्यांचे पथक रिकाम्या हाताने परतले आहे. मेहुल याला जामीन देण्यास डोमिनिका न्यायालयाने नकार दिला आहे.आता त्याच्या हेबिअस कॉर्पस अर्जाची पुढील सुनावणी जुलैमध्ये होणार आहे. त्यामुळे मेहुल चोकसीला सध्या तरी भारतात आणणे अशक्य बनले आहे. त्याला भारतात आणण्याच्या मोहिमेवर अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी व सीबीआयच्या बँक सिक्युरिटीज व आर्थिक घोटाळे विभागाचे मुंबईचे प्रमुख हे कतार एअरवेजच्या विमानाने डोमिनिका येथे पोहोचले होते. डोमिनिकामध्ये अवैधरीत्या प्रवेश केल्याच्या आरोपावरून मेहुलला अटक करण्यात आली आहे. तो जखमी असल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.अँटिग्वाची तयारीमेहुल चोकसी हा अँटिग्वातून डोमिनिकामार्गे क्युबाला पळून जाण्याच्या तयारीत होता, असा दावा करण्यात येत आहे. नेमके त्याच वेळेस त्याला डोमिनिकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. डोमिनिकाने त्याला भारताच्या हवाली करावे, अशी भूमिका अँटिग्वाने घेतलीआहे.अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉवने यांनी  सांगितले की, चोकसीवर भारतामध्ये फौजदारी खटले सुरू आहेत. त्याला डोमिनिकातून पुन्हा अँटिग्वाला पाठवू नये, असे आम्ही त्या देशाच्या सरकारला कळविले.