शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालये पैसे कमावण्याची मशिन बनलेत, सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 11:18 IST

जीवनाचं मूल्य दाखवून रुग्णालयांची भरभराटी होण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी... अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने काढलेल्या अधिसूचनेसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी खासगी रुग्णालयांना धारेवर धरले आहे.

ठळक मुद्देजीवनाचं मूल्य दाखवून रुग्णालयांची भरभराटी होण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी... अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने काढलेल्या अधिसूचनेसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी खासगी रुग्णालयांना धारेवर धरले आहे.

नवी दिल्ली - कोरोना संकटात अनेक रुग्णालयांकडून गरिबांची झालेली लूट पाहता सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयांना चांगलंच फटकारलं आहे. रुग्णालये हे सर्वात मोठे उद्योग बनले आहेत. विशेष म्हणजे मानवी जीवनाला संकटात टाकून हे उद्योग उभारत आहेत. त्यामुळे, खासगी रुग्णालयांना लहान निवास भवन बनवण्यास परवानगी देण्याऐवजी राज्य सरकारनेच उत्तम दर्जाची रुग्णालये उभारावीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 

जीवनाचं मूल्य दाखवून रुग्णालयांची भरभराटी होण्यास आम्ही परवानगी देऊ शकत नाही. त्याऐवजी रुग्णालये बंद केलेली बरी... अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने काढलेल्या अधिसूचनेसंदर्भातील याचिकेवरील सुनावणीवेळी खासगी रुग्णालयांना धारेवर धरले आहे. रुग्णालये ही रिअल इस्टेट बिझनेस बनत आहेत, रुग्णांना संकटकाळात मदत करण्याऐवजी पैसे कमाविण्याची मिशन बनले आहेत. नर्सिंग होममधील कमतरतेला माफी देण्याचा काहीच अर्थ नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.  

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड यांनी म्हटले की, एकदा आम्ही एखादा आदेश दिला की, त्याच्यावर अधिसूचना जारी करून कोणालाही कुरघोडी करता येणार नाही. गुजरात सरकारने मात्र रुग्णालयांना संपूर्ण मोकळीकच देऊन टाकली. अग्निसुरक्षेच्या निकषांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे २०२२ पर्यंत पालन केले नाही, तरी चालेल, असे या अधिसूचनेत म्हटले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात योग्य अग्निसुरक्षा यंत्रणा बसेपर्यंत लोक होरपळून मरण्याच्या घटना घडतच राहतील.

अग्निसुरक्षा निकषांसंदर्भात अधिसूचनेवर संताप  

कोरोना रुग्णालयांतील अग्निसुरक्षेच्या निकषांबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशावर कुरघोडी करण्यासाठी गुजरात सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला आहे. या अधिसूचनेमुळे अग्निसुरक्षा नसलेल्या रुग्णालयांना आणखी वेळ मिळेल. त्यांनी कृती करेपर्यंत मात्र लोक असेच होरपळून मरण्याची शक्यता आहे, अशा शब्दांत न्यायालयाने गुजरात सरकारला फटकारले आहे. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयfireआग