तुरुंगातही छोटा राजनच्या जीवाला शकीलकडून धोका

By Admin | Updated: May 2, 2016 01:57 IST2016-05-02T01:57:34+5:302016-05-02T01:57:34+5:30

गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये इंडोनेशियाच्या बाली येथे अटक झाल्यानंतर भारतात आणण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याच्या जीवाला तिहार तुरुंगातही छोटा शकीलपासून

In the prison, Rajan's life threatens Shikikilak | तुरुंगातही छोटा राजनच्या जीवाला शकीलकडून धोका

तुरुंगातही छोटा राजनच्या जीवाला शकीलकडून धोका

नवी दिल्ली : गेल्या वर्षी आॅक्टोबरमध्ये इंडोनेशियाच्या बाली येथे अटक झाल्यानंतर भारतात आणण्यात आलेला कुख्यात गुन्हेगार छोटा राजन याच्या जीवाला तिहार तुरुंगातही छोटा शकीलपासून धोका आहे आणि त्याला संपविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू सहकारी असलेला छोटा शकील याच्या मोबाईल फोनवरून तिहार तुरुंगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना एसएमएस पाठविले जात आहेत आणि त्यात छोटा राजनला संपविण्यात येणार असल्याची धमकी दिली जात आहे. राजनला मिळणाऱ्या या धमकीमुळे त्याला अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातही अतिरिक्त सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, असे या सूत्रांनी सांगितले.
९७१५०४२६५१३८ या मोबाईल फोन नंबरवरून तिहारचे विधी अधिकारी सुनील गुप्ता यांना एसएमएस पाठविण्यात आला आहे. छोटा राजनला आता लवकरच संपविण्यात येईल, अशी धमकी त्यात दिलेली आहे. अशाचप्रकारचा एक फोन तिहार तुरुंगाच्या लँडलाईन फोनवर आला होता. या फोन आणि एसएमएसबद्दल दिल्ली पोलिसांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती या सूत्रांनी दिली.(वृत्तसंस्था)

 

Web Title: In the prison, Rajan's life threatens Shikikilak