मॉलमधील हुक्का पार्लरवर छापा
By admin | Updated: July 7, 2015 22:54 IST
नवी मुंबई : खारघरच्या प्राइम मॉलमध्ये बेकायदा चालणार्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी हुक्का पार्लर चालक, कामगार व १७ ग्राहक अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉलमधील हुक्का पार्लरवर छापा
नवी मुंबई : खारघरच्या प्राइम मॉलमध्ये बेकायदा चालणार्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली. यावेळी हुक्का पार्लर चालक, कामगार व १७ ग्राहक अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खारघर सेक्टर १२ येथील प्राइम मॉलमधील दोन दुकानात हुक्का पार्लर सुरू होते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या बेकायदा हुक्का पार्लरची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. त्यानुसार मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक सुनील बाजारे, सहाय्यक निरीक्षक कृष्णा कोकणी यांच्या पथकाने सोमवारी छापा टाकला. त्यामध्ये हुक्का पार्लरसाठी विशेष सोय करून ग्राहकांना सर्व साहित्य पुरवले जात असल्याचे आढळले. त्यानुसार हुक्का पार्लर चालक रोहन डिकोस्टा व उत्कर्ष पांडे, कामगार व १७ ग्राहक अशा २३ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजारे यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)