प्राचार्य, शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 04:28 IST2018-09-21T04:28:11+5:302018-09-21T04:28:15+5:30

न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर सतत नऊ महिने बलात्कार करणा-या शाळेचा मुख्याध्यापक व एक शिक्षक यांना पोलिसांनी अटक केली.

Principal, teacher of teacher's rape rape | प्राचार्य, शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

प्राचार्य, शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार

- एस.पी. सिन्हा 
पाटणा : येथील न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या १२ वर्षांच्या विद्यार्थिनीवर सतत नऊ महिने बलात्कार करणा-या शाळेचा मुख्याध्यापक व एक शिक्षक यांना पोलिसांनी अटक केली. या शाळेलाही पोलिसांनी टाळे ठोकले आहे. शाळेत आसपासचे ९० विद्यार्थी शिकत होते.
मुलीचा गृहपाठ तपासण्याच्या व गुण वाढवून देण्याच्या नावाखाली अभिषेक या शिक्षकामार्फत शाळेचा मुख्याध्यापक अरविंद कुमार ऊर्फ राज सिंघानिया याने या मुलीला कार्यालयात बोलावून घेतले होते. त्यानंतर तिला कार्यालयाशेजारी असलेल्या आपल्या केबिनमध्ये नेऊ न प्राचार्याने तिच्यावर बलात्कार केला. त्याचे छायाचित्रण अभिषेक या शिक्षकाने केले. त्यानंतर ती व्हिडिओ क्लिप व छायाचित्रे सर्वांना दाखविण्याची धमकी देऊ न प्राचार्याने व शिक्षकाने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
मुलीने हा प्रकार घाबरून घरच्यांनाही सांगितला नाही. एकेदिवशी तिला घरातच चक्कर आली आणि उलट्याही झाल्या. तिच्या वागण्यातही काही बदल झाल्याचे घरच्यांना जाणवले. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेण्यात आले, तेव्हा ती दोन महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. त्याविषयी डॉक्टर व पालकांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने घाबरतच हा सारा प्रकार सांगितला. त्याआधारे पालकांनी पोलीस ठाण्यात लगेच तक्रार केली. पोलिसांनी पोस्को कायद्याखाली गुन्हा नोंदवून घेतला आणि प्राचार्य सिंघानिया व अभिषेक यांना अटक केली. पोलिसांनी शाळेची व प्राचार्याच्या कार्यालयाची तपासणी केली. तेव्हा कार्यालयाशेजारील त्याच्या केबिनमध्ये कॉट, टीव्ही, फ्रीज असल्याचे आणि तो अनेकदा तिथेच राहत असल्याचे उघड झाले.
>मोबाईलमध्ये सापडली छायाचित्रे
पोलिसांनी प्राचार्य व शिक्षक या दोघांचे मोबाईलही ताब्यात घेतले आहेत. त्या मोबाईलमध्ये या विद्यार्थिनीसोबत दोघांनी स्वत:ची काढलेली अनेक छायाचित्रेही आढळून आली आहेत.
सिंघानियाचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी असून, त्याचे काही नातेवाईकही पोलीस दलात आहेत.

Web Title: Principal, teacher of teacher's rape rape