प्राचार्यांनी विद्यार्थिनींना कपडे काढायला लावले?

By Admin | Updated: April 1, 2017 01:26 IST2017-04-01T01:26:58+5:302017-04-01T01:26:58+5:30

येथील डिगरी गावातील कस्तुरबा गांधी निवासी शाळेतील विद्यार्थिनींना महिला प्राचार्यांनी कपडे काढायला

Principal forced women to wear clothes? | प्राचार्यांनी विद्यार्थिनींना कपडे काढायला लावले?

प्राचार्यांनी विद्यार्थिनींना कपडे काढायला लावले?

मुजफ्फरनगर : येथील डिगरी गावातील कस्तुरबा गांधी निवासी शाळेतील विद्यार्थिनींना महिला प्राचार्यांनी कपडे काढायला लावल्याच्या चर्चेने एकच खळबळ उडाली आहे. या शाळेतील मुलींनीच हा आरोप केला असून, प्राचार्यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. तथापि, या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
पीडितांच्या कुटुंबांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डिगरी गावातील कस्तुरबा गांधी निवासी शाळेतील विद्यार्थिनींना येथील प्राचार्यांनी कपडे काढायला भाग पाडले. जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी चंदर केश यादव यांनी सांगितले की, या प्राचार्यांनी त्यांचा आदेश न ऐकल्यास गंभीर परिणाम होतील अशी कथित धमकी दिली होती. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.
एका विद्यार्थिनीने सांगितले की, आम्हाला निवासी शाळेतून खाली एके ठिकाणी बोलविण्यात आले. मॅडमने कपडे उतरविण्यास सांगितले. असे न केल्यास मारहाण करण्याची धमकीही त्यांनी दिली. आम्ही मुली काय करणार? प्राचार्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Principal forced women to wear clothes?