शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

रिझर्व बँकेच्या १.७६ लाख कोटींबाबत पंतप्रधान कार्यालयच घेणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 07:05 IST

अर्थ खात्यास निर्णय न घेण्याचा सल्ला; महसुली तुटीची भरपाई?

हरिश गुप्ता नवी दिल्ली : आर्थिक मंदीमुळे महसुलात घट झाल्यामुळे रिझर्व बँकेकडून आलेले १.७६ लाख कोटी रुपयांच्या वापराचा निर्णय अर्थ मंत्रालय नव्हे, तर पंतप्रधान कार्यालयच घेणार आहे. या रकमेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे पंतप्रधान कार्यालयाने अर्थ मंत्रालयाला कळविले असल्याचे वृत्त आहे.

वाढती महसुली तूट भरून काढण्यासाठी सरकार ही रक्कम वापरेल, अशी टीका विरोधकांनी याआधीच केली आहे. मात्र त्यावर अर्थ मंत्रालयाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. विमल जालान समितीच्या शिफारशीनुसार रिझर्व बँकेने आपल्या गंगाजळीतील १0 लाख कोटींपैकी १.७६ लाख कोटी रुपये केंद्राला दिले आहेत. त्या रकमेबाबत निर्णय घेण्यासाठी अर्थ मंत्रालय व पंतप्रधान कार्यालय यांची लवकरच बैठक अपेक्षित आहे.पंतप्रधान कार्यालयात लवकरच होणाऱ्या बदलांमुळे ही बैठक लांबली आहे. पंतप्रधानांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा पुढील आठवड्यात सेवामुक्त होत असून, नवे सहा अधिकारी येणार आहेत. ते आल्यानंतरच बैठक होईल, असे समजते.ही रक्कम मंदीत अडकलेल्या क्षेत्रांना मदत म्हणून देण्याऐवजी पायाभूत सुविधांसाठी व अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी वापरावी, असा एक मतप्रवाह आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच पुण्यात पत्रकारांना सांगितले की हा निधी कुठे वापरायचा, याचा निर्णय व्हायचा आहे. त्यामुळे मी त्याविषयी सांगू शकत नाही.या निधीच्या वापराबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ आणि जाहीर करू. सीतारामन यांनी बुधवारी उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींशी बुधवारी बराच काळ चर्चा केली आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे आश्वासनही दिले.तयार करणार आराखडामहसुलातील तुटीवर मार्ग काढण्यासाठी व अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी पंतप्रधान कार्यालय एक आराखडा तयार करीत आहे. त्यात कर्जे कमी करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते. रिझर्व बँकेकडून मिळालेल्या निधीच्या वापराबाबतही या आराखड्यामध्ये उल्लेख असू शकेल.

टॅग्स :businessव्यवसायprime ministerपंतप्रधानReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक