पंतप्रधानांनी घेतला स्वीय कर्मचार्‍यांचा निरोप

By Admin | Updated: May 14, 2014 04:35 IST2014-05-13T20:18:33+5:302014-05-14T04:35:25+5:30

डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात आपल्या स्वीय कर्मचार्‍यांचा जातीने निरोप घेतला व दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. दशकभराच्या सहवासाची ही सांगता भावपूर्ण होती.

Prime Minister's leave for the employees | पंतप्रधानांनी घेतला स्वीय कर्मचार्‍यांचा निरोप

पंतप्रधानांनी घेतला स्वीय कर्मचार्‍यांचा निरोप

नवी दिल्ली: येत्या काही दिवसांत पंतप्रधान पदावरून पायउतार होणार असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात आपल्या स्वीय कर्मचार्‍यांचा जातीने निरोप घेतला व दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. दशकभराच्या सहवासाची ही सांगता भावपूर्ण होती.
सूत्रांनुसार पंतप्रधान कार्यालयातील ११० स्वीय कर्मचार्‍यांना व्यक्तिश: भेटून व हस्तांदोलन करून डॉ. सिंग यांनी प्रत्येकाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
गेली सलग १० वर्षे पंतप्रधान असलेल्या डॉ. सिंग यांचे या स्वीय कर्मचार्‍यांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. याखेरीज ज्यांचा पंतप्रधानांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही अशा पंतप्रधान कार्यालयातील इतर ४०० कर्मचार्‍यांनीही पीएमओच्या व्हरांड्यात एकत्र जमून मावळत्या पंतप्रधानांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात निरोप दिला.
शुक्रवारी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर नवे सरकार अधिकारावर येण्यापूर्वी डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखीली संपुआ-२ सरकारच्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होईल. त्यानंतर ते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतील. राष्ट्रपती भवनातून परतल्यावर डॉ. सिंग राष्ट्राला उद्देशून भाषण करतील, असेही सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनुसार शनिवारी पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्‍यांसाठी चहापान आयोजित करतील व नंतर रात्री राष्ट्रपती मावळत्या मंत्रिमंडळासाठी आयोजित भोजन समारंभाचे यजमानपद भूषवतील.
दरम्यान, नव्या पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी पीएमओची रंगरंगोटी करून त्यास झकपक करण्यात येत आहे. बाहेरून दगडी बांधकाम असलेल्या या १०० वर्षांहून जुन्या इमारतीची अंतर्गत सजावट खास करून नव्याने करण्यात येत आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Prime Minister's leave for the employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.