वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी पंतप्रधानांचा पुढाकार
By Admin | Updated: August 14, 2014 01:52 IST2014-08-14T01:52:57+5:302014-08-14T01:52:57+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वर्धा- यवतमाळ-नांदेड या २७० किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: पुढाकार घेणार

वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेसाठी पंतप्रधानांचा पुढाकार
शीलेश शर्मा, नवी दिल्ली
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वर्धा- यवतमाळ-नांदेड या २७० किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: पुढाकार घेणार आहेत. या प्रस्तावित प्रकल्पाची समीक्षा करण्याचे आणि सर्व अडथळे दूर करण्याचे आश्वासन बुधवारी पंतप्रधानांनी लोकमत समूहाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांना
दिले. खा. विजय दर्डा यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. विदर्भातील हा भाग मागासलेला असल्यामुळे विकासात नेहमी मागे राहतो. याच कारणास्तव मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होतात. ही नवी रेल्वेयोजना विदर्भासाठी ‘जीवन रेखा’ सिद्ध होऊ शकेल, असे त्यांनी पत्राद्वारे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले.