शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
4
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
5
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
6
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
7
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
8
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
10
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
11
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
12
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
13
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
16
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
17
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
18
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
19
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

साबरमतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो; काँग्रेसची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:01 AM

साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली/अहमदाबाद : साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे मिनी रोड शो केला खरा; पण त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाले असून, निवडणूक आयोग त्याप्रकरणी काहीच कारवाई करीत नसल्यामुळे हा निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे. भाजपच्या दबावाखाली निवडणूक आयोग काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर नरेंद्र मोदींनी मिनी रोड शो केला. आपल्या कारच्या फूटबोर्डवर उभे राहून ते ३०० मीटरहून अधिक अंतर लोकांना हात दाखवत गेले. मोदींनी कारच्या फूटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन केले. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी बरीच गर्दी झाली होती आणि भाजपचे झेंडेही त्यावेळी फडकावले जात होते. ही सर्व दृश्ये सर्व वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आली.त्यानंतर लगेचच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गहलोत व प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊ न नरेंद्र मोदी व निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला. गुजरातमध्ये मतदानानंतर पंतप्रधान लगेच रोड शो करीत असतील, तर त्याबद्दल निवडणूक आयोग काही कारवाई करणार का, असा सावल त्या दोघांनी केला. संकेत व नियम लोकांच्या डोळ्यादेखत पायदळी तुडवले जात आहेत, असे सांगून अशोक गहलोत म्हणाले की, मोदींनी आचारसंहितेचे उघड उल्लंघन केले असून, त्याची आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत. गुजरातमध्ये पराभव होणार असल्याचे दिसत असल्याने हताश झालेले भाजप नेते असे प्रकार करीत आहेत, असा टोला लगावून रणदीप सूरजेवाला म्हणाले की, हे सारे दिसत असूनही निवडणूक आयोग त्याबद्दल पंतप्रधानांकडे विचारणाही करताना दिसत नाही. निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहे आणि भाजपने आयोगाला ओलीसच ठेवले आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या विमानतळावरील पत्रकार परिषदेवरही निवडणूक आयोगाने सोयिस्कर मौन बाळगले, असा आरोप सूरजेवाला यांनी केला. निवडणूक आयोग देशाच्या राज्यघटनेकडेच दुर्लक्ष करीत असल्याची टीका करून ते म्हणाले की, राहुल गांधींच्या टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग अर्ध्या तासात कारवाई करते; पण मोदींचा रोड शो सर्वत्र दिसत असतानाही आयोग गप्प राहतो.चिदम्बरम यांचाही हल्लाबोलकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनीही निवडणूक आयोग दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका केली. राहुल गांधी यांना टीव्हीवरील मुलाखतीबद्दल आयोग नोटीस बजावतो; पण पंतप्रधान रोड शोद्वारे मतदानाच्या दिवशी प्रचार करतात, रेल्वेमंत्री व भाजपचे अध्यक्ष दिल्ली व अहमदाबाद विमानतळावर पत्रकार परिषद घेतात, याकडे निवडणूक आयोग दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्याविरुद्ध साधी तक्रारही दाखल करण्यात आली नाही, याचा उल्लेख करीत चिदम्बरम यांनी निवडणूक आयोगावर हल्ला चढवला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017