शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

मीरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उभारणार भव्य मंदिर, चाहत्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 18:38 IST

मीरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्याचा निर्णय येथील एका त्यांच्या चाहत्यांने घेतला आहे. निवृत्त सहाय्यक अभियंता जेपी सिंह असे या चाहत्याचे नाव असून त्यांनी हा निर्णय घेतला असून या मंदिरात नरेंद्र मोदी यांचा 100 फूट उंचीचा धातूचा पुतळा असणार आहे. सिंचन विभागातून निवृत्त झालेले सहाय्यक अभियंता जेपी सिंह यांनी ...

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांचा 100 फूट उंचीचा धातूचा पुतळा सुरुवातीला 10 कोटी रुपयांचा खर्च येणार पायाभरणी येत्या 23 ऑक्टोबरला

मीरत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्याचा निर्णय येथील एका त्यांच्या चाहत्यांने घेतला आहे. निवृत्त सहाय्यक अभियंता जेपी सिंह असे या चाहत्याचे नाव असून त्यांनी हा निर्णय घेतला असून या मंदिरात नरेंद्र मोदी यांचा 100 फूट उंचीचा धातूचा पुतळा असणार आहे. सिंचन विभागातून निवृत्त झालेले सहाय्यक अभियंता जेपी सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, जगभरातील लाखो लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लाइक करतात. त्यांनी आतंरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची सकारात्मक प्रतिमा सादर केली आहे. तसेच, त्यांच्या देश सेवेला प्रभावित होऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे.  जिल्ह्यातील मीरत-करनाल महामार्गावर सारधाना परिसरात नरेंद्र मोदींचे मंदिर उभारण्यात येणार आहे. याचबरोबर या पवित्र जागेत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती असणार आहे. तसेच, नरेंद्र मोदींच्या या मंदिराची पायाभरणी येत्या 23 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे, असे जेपी सिंह यांनी सांगितले.  मंदिर बांधकामासाठी सुरुवातीला 10 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी देणग्यांच्या माध्यमातून हा निधी उभारण्यात येणार आहे. अनेक लोकांनी यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, या मंदिराचे काम दोन वर्षांत पूर्ण होणार आहे, असे जेपी सिंह म्हणाले. आम्ही जमीन आणि पैशाची व्यवस्था केली आहे. तसेच, या मंदिराचे कामकाल एका ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यासाठी येत्या गुरुवारी अधिकृत नोंदणी सुद्धा करण्यात येणार आहे, असे जेपी सिंह यांनी सांगितले. मात्र, त्यांनी या ट्रस्टबाबत अधिक माहिती सांगण्यास नकार दिला. दरम्यान, दुसरीकडे गुजरातमध्ये नर्मदा नदीजवळ 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभारण्यास सुरुवात केली आहे. या स्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी