शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी उद्या केदारनाथ-बद्रीनाथ धामला भेट देणार, पंतप्रधान झाल्यानंतर सहाव्यांदा दौऱ्यावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 11:41 IST

3400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणीही नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) शुक्रवारी उत्तराखंड (Uttarakhand) दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान केदारनाथ (Kedarnath) आणि बद्रीनाथ (Badrinath) मंदिरात पूजा करण्यात येणार आहे. याशिवाय, 3400 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांची पायाभरणीही नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे. 

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत पाच वेळा केदारनाथला भेट दिली आहे. पंतप्रधान म्हणून ते 3 मे 2017 रोजी पहिल्यांदा केदारनाथला गेले होते. दरम्यान, यावर्षी केदारनाथ धामचे दरवाजे 27 ऑक्टोबरला आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे 19 नोव्हेंबरला बंद होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी 8.30 वाजता केदारनाथ मंदिरात पोहोचतील आणि तेथे पूजा करतील. यानंतर ते 9 वाजता केदारनाथ रोपवे प्रकल्पाची पायाभरणी करतील. यादरम्यान नरेंद्र मोदी आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीलाही भेट देणार आहेत. तसेच, आपल्या दौऱ्यात ते मंदाकिनी आणि सरस्वती नदीच्या काठावर सुरू असलेल्या विकासकामांचाही आढावा घेणार आहेत.

यानंतर केदारनाथहून ते साडेअकरा वाजता बद्रीनाथला पोहोचतील आणि तेथे पूजा आणि दर्शन घेतील. दरम्यान, केदारनाथमध्ये बांधण्यात येणारा रोपवे 9.7 किमी लांबीचा असणार आहे. तो गौरीकुंडला केदारनाथशी जोडला जाईल. त्यामुळे या दोन्ही ठिकाणचा प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे. सध्या या प्रवासाला सहा तासांपेक्षा जास्त वेळ लागतो.

यापूर्वी झालेले दौरे...- 3 मे 2017 - केदारनाथ धाममध्ये दर्शन आणि पूजा.- 19 ऑक्टोबर 2017 - केदारनाथ धाममध्ये दर्शन आणि पूजा, अनेक बांधकाम कामांची पायाभरणी.- 7 नोव्हेंबर 2018 - 2018 च्या दिवाळीच्या दिवशी केदारनाथ धामला भेट दिली, पुनर्निर्माण कामांचा आढावा घेतला.- 18 मे 2019 - लोकसभा 2019 ची निवडणूक प्रचार संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी केदारनाथला गेले, गुहेत ध्यान केले.- 5 नोव्हेंबर 2021 - अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीKedarnathकेदारनाथUttarakhandउत्तराखंड