शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागणार नाहीत, व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:41 AM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संसदेत सुरू असलेल्या गोंधळानंतरही माफी मागण्याची काँग्रेसची मागणी भाजपाने तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावली.राज्यसभेचे कामकाज याच मुद्यावर दुपारी दोनपर्यंत दोन वेळा तर लोकसभेचे कामकाज दोन वेळा तहकूब करावे लागले. मुख्य विरोधी पक्षाने सभात्यागही केला. संसदेचे अधिवेशन सुरू झाल्यापासून माफी मागण्यावरून काँग्रेसने दोन्ही सभागृहांत गोंधळ सुरूच ठेवला आहे. बुधवारी काँग्रेसला दोन मोठे धक्के बसले. पहिला होता तो या मुद्यावर एकत्र आलेले विरोधक विस्कळीत झाले तेव्हा. मोदी यांनी माफी मागावी या काँग्रेसच्या मागणीला पाठिंबा द्यायला समाजवादी पक्षाने नकार दिला. दुसरीकडे सरकार काही बोलणार मोदी यांनी सभागृहात आरोप केले नसल्याने त्यांनी माफी मागावी, अशी सूचना करता येणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले.सभागृहाचे कामकाज होऊ न देण्याच्या उद्देशाने काँग्रेससह इतर पक्ष आपल्या मागणीसाठी घोषणाबाजी करीत होते त्यावेळी नायडू यांनी स्वत:हूनच वरील निर्णय जाहीर केला. नायडू कडक व कठोर शब्दांत म्हणाले की ही काही पद्धत नाही. तिकडे लोकसभेत संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी काँग्रेसची माफी मागण्याची मागणी साफ फेटाळून लावली व काँग्रेसकडे काही मुद्दाच उरलेला नाही, ते सभागृहाला जबरदस्तीने विस्कळीत करीत आहेत, असा आरोप केला. राज्यसभेत विरोधी पक्षांचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आम्ही मोदी यांच्याकडून खुलासा मागत आहोत, असे म्हटले. काँग्रेसची भूमिका मवाळ झाली याचे कारण असे की लोकसभेत मोदी उपस्थित होते. काँगे्रसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत पक्षाचे सदस्य सभागृहात गोंधळ घालत होते व मनमोहनसिंग यांची माफी मागावी, अशा घोषणा देत होते. परंतु समोर बसलेल्या मोदी यांच्यावर त्याचा काही परिणाम झालेला दिसत नव्हता.आरोप मागे घ्या-भाजपचा आक्रमक पवित्रा आणि विरोधकांच्या एकीत पडलेली फूट पाहून काँग्रेसने आपल्या माफी मागण्याच्या मागणीवर मवाळ भूमिका घेतल्याचे दिसत आहे. सकाळपर्यंत माफी मागण्याच्या अटीवर अडलेला काँग्रेस पक्ष सायंकाळी आम्ही पंतप्रधानपदाचा सन्मान करतो परंतु मोदी यांनी सभागृहात स्पष्टीकरण द्यावे की त्यांनी गुजरातेत निवडणूक जिंकण्यासाठी आरोप केले होते व आता ते मी परत घेत आहे, असे म्हणण्यापर्यंत आला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधान