Prime Minister Narendra Modi will interact with the 45 companies CEO on 26th October | भारतासाठी सोन्याचे दार उघडणार; पंतप्रधान दिग्गज तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत संवाद साधणार

भारतासाठी सोन्याचे दार उघडणार; पंतप्रधान दिग्गज तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत संवाद साधणार

नवी दिल्ली : येणारा सोमवार भारतासाठी सोन्याचा दिवस ठरणार आहे. कारण नीती आयोग आणि पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने आयोजित वार्षिक कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ६ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोठमोठ्या कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तेल व वायू क्षेत्रातील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी २०३० पर्यंत २१ लाख कोटींची गुंतवणूक होण्याची शक्यता आहे.


जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यक्रमाला असणार आहेत.  भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक देश बनला आहे. भारतीय तेल वायू साखळीत गुंतवणूक वाढवण्यासाठी सर्वोत्तम पद्धती जाणून घेणे, सुधारणांवर चर्चा, रणनीतींची माहिती देणे हा या बैठकीचा उद्देश आहे. जागतिक तेल आणि वायू क्षेत्राला आकार देणारे सुमारे ४५ मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्रमुख हितधारक उपस्थित राहणार आहेत. ही बैठक दोन वर्षांतून एकदा होते. 


पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे उद्‌घाटनपर भाषण होईल. त्यानंतर तेल आणि वायू क्षेत्राचा आढावा घेणारे आणि भारतीय तेल व वायू क्षेत्रातील महत्वाकांक्षा व संधी स्पष्ट करणारे सर्वसमावेशक सादरीकरण होईल. जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तज्ज्ञांशी परस्परसंवाद सत्र घेण्यात येईल. डॉ. सुलतान अहमद अल जबर , मुख्य कार्यकारी अधिकारी, अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (एडीएनओसी) आणि युएईचे उद्योग व प्रगत तंत्रज्ञान मंत्री . साद शेरीदा अल-काबी, कतार पेट्रोलियमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कतारचे ऊर्जा राज्यमंत्री, उपसभापती, ओपेक ऑस्ट्रियाचे सरचिटणीस मोहम्मद सनुसी बरकिंडो हे तेल व वायू क्षेत्रावरील माहितीची देवानघेवान करतील. 


याशिवाय रॉसनेफ्ट रशियाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इगोर सेचीन, बीपी लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी बर्नार्ड लूनी , टोटल एस ए, फ्रान्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पौयांने , आर.आय.एल. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी, आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, फ्रान्सचे कार्यकारी संचालक डॉ. फतिह बिरोल, सौदी अरेबियाचे आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाचे महासचिव जोसेफ मॅक मॉनिगल, आणि जीईसीएफचे महासचिव यूरी सेंटीयुरीन तसेच लिओन्डेल बासेल, टेलुरियन, स्लमबर्गर, बेकर ह्यूजेस, जेईआरए, इमर्सन आणि एक्स-कोल, इंडियन ऑईल अँड गॅस कंपन्यांचे अधिकारी आपले विचार मांडणार आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Prime Minister Narendra Modi will interact with the 45 companies CEO on 26th October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.