राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी अचानक पोहोचले पंतप्रधान मोदी; भेटीचे कारण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 15:23 IST2025-08-03T15:14:14+5:302025-08-03T15:23:58+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपती भवनाने सोशल मीडियावर या बैठकीचा एक फोटो शेअर केला.

Prime Minister narendra Modi suddenly arrived to meet President Draupadi Murmu; What is the reason for the meeting? | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी अचानक पोहोचले पंतप्रधान मोदी; भेटीचे कारण काय ?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी अचानक पोहोचले पंतप्रधान मोदी; भेटीचे कारण काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी राष्ट्रपती भवनात अचानक दाखल झाले. येथे त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यासंदर्भातील माहिती राष्ट्रपती भवनाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिली. राष्ट्रपती भवनाने एक्सवर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचा फोटो शेअर केला.

राष्ट्रपती भवनाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.' पंतप्रधानांच्या राष्ट्रपतींसोबतच्या भेटीनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. भेटीची माहिती लगेच उपलब्ध नव्हती, पण त्याचे कारण आता जवळजवळ स्पष्ट झाले आहे.

‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप

या मुद्द्यांवर चर्चा झाली

बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये विशेष सघन आढावा (SIR) वर चर्चा करण्याच्या विरोधकांच्या मागणीवरून संसदेत निर्माण झालेल्या गतिरोधाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातील ही बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चा करण्याच्या मागणीवरून संसदेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये बराच गोंधळ झाला. संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलै रोजी सुरू झाले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून लष्करी उपकरणे आणि कच्चे तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर २५ टक्के कर आणि दंडाची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान मोदींची राष्ट्रपती मुर्मू यांच्याशी भेट झाली.

Web Title: Prime Minister narendra Modi suddenly arrived to meet President Draupadi Murmu; What is the reason for the meeting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.