Narendra Modi : Video - लय भारी! मोदींचा अनोखा अंदाज, मुलांसाठी झाले जादूगार, कपाळावर नाणं ठेवलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:16 IST2023-11-16T18:11:51+5:302023-11-16T18:16:15+5:30

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. चिमुकल्यांसोबत मोदींनी मजा, मस्ती अन् धमाल केली आहे.

prime minister narendra modi share video with young children | Narendra Modi : Video - लय भारी! मोदींचा अनोखा अंदाज, मुलांसाठी झाले जादूगार, कपाळावर नाणं ठेवलं अन्...

Narendra Modi : Video - लय भारी! मोदींचा अनोखा अंदाज, मुलांसाठी झाले जादूगार, कपाळावर नाणं ठेवलं अन्...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला आहे. चिमुकल्यांसोबत मोदींनी मजा, मस्ती अन् धमाल केली आहे. लहान मुलांसाठी ते जादूगार देखील झाले. नाण्याची एक भन्नाट जादू दाखवली. त्यांच्या जादूचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मोदींना चिमुकल्यांबद्दल विशेष प्रेम, आपुलकी आहे. ते नेहमीच मुलांना प्रोत्साहन देत असतात. 

मोदींनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तो जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र त्याचीच चर्चा रंगली आहे. यामध्ये पंतप्रधान दोन लहान मुलांसोबत मजा करताना दिसत आहेत. त्यांनी एक नाणं घेतलं आणि मुलांना त्यासंबंधीत एक जादू देखील करून दाखवली. मुलांसोबत घालवलेले काही अविस्मरणीय क्षण असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

पंतप्रधान मोदींनी आपल्या निवासस्थानी एका कुटुंबाची भेट घेतली. कुटुंबातील दोन मुलंही पंतप्रधानांना भेटण्यासाठी आली होती. पंतप्रधानांनी मुलांसोबत खूप मस्ती केली. त्यांनी एक नाणं घेतलं आणि ते आपल्या कपाळावर चिटकवलं आणि मुलांना जादू दाखवली. त्यानंतर मुलांना देखील तसंच करायला सांगितलं. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.  
 
पंतप्रधान मोदींनी मुलांसोबत वेळ घालवण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही ते अनेकवेळा मुलांसोबत मस्ती करताना दिसले आहेत. यावर्षी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तीन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी मुलांची भेट घेतली. ट्विटरवर मुलांसोबतचा फोटो शेअर करताना मोदींनी निरागस मुलांसोबतचे काही आनंदाचे क्षण, त्यांची ऊर्जा आणि उत्साह पाहून मन आनंदाने भरून जातं असं म्हटलं होतं. 
 

Web Title: prime minister narendra modi share video with young children